News Flash

Euro Cup 2020 : क्रोएशियाचा स्कॉटलंडवर ३-१ ने विजय तर इंग्लंडची चेक रिपब्लिकवर मात

क्रोएशियाने स्कॉटलंडला ३-१ ने हरवत बाद फेरीतील स्थान निश्चित केले आहे

क्रोएशियाने स्कॉटलंडला ३-१ ने हरवत बाद फेरीतील स्थान निश्चित केले आहे. ड गटामध्ये क्रोएशिया दुसऱ्या स्थानावर असून त्यांचा पुढील सामना इ गटात रनर अप होईल. लुका मॉड्रिक हा क्रोएशियाकडून सर्वात कमी आणि सर्वात जास्त वयात गोल करणारा पहिला खेळाडू ठरला. त्याने त्याच्या कारकीर्दित पहिला गोल २२ वर्षाचा असतांनी केला होता. आता तो ३५ वर्षाचा आहे. दरम्यान ३५ वर्षीय लुका मॉड्रिकने स्कॉटलंड विरूद्ध गोल केला आहे.

२२ वर्षाचा असतांनी लुका मॉड्रिकने ऑस्ट्रिया विरूद्ध गोल केला होता. क्रोएशिया विरूद्धच्या पराभवामुळं ऑस्ट्रिया स्पर्धेतून बाहेर पडले होते. ऑस्ट्रियाने ड गटात शेवटचे स्थान मिळवले होते. ऑस्ट्रियाच्या खात्यात फक्त एक गुण जमा आहे.

क्रोएशियाचा पहिला गोल १७ व्या मिनिटाला झाला. Nikola Vlasic ने हा गोल केला. त्यानंतर ६१ मिनिटाला लुका मोड्रिक ने गोल केला. तर ७७ मिनिटाला इवान पेरिसिक ने गोल केला. स्कॉटलंडला मात्र एक गोल करता आला. Callum McGregor याने ४२ मिनिटाला गोल केला.

चेक रिपब्लिक विरूद्ध इंग्लंड या सामन्यात इंग्लडने पहिल्या सत्राच चेक रिपब्लिक वर १ गोलची आघाडी मिळवली. इंग्लडच्या स्टर्लिंगने हा गोल झळकवला. त्यानंतर चेक रिपब्लिक संघ शेवटच्या क्षणापर्यंत गोलची बरोबरी करण्यासाठी झगळत राहिला. मात्र त्यांना बरोबरी करता आली नाही. त्यामुळे चेक रिपब्लिक संघ १-० ने पराभूत झाला. चेक रिपब्लिकच्या बाद फेरितील आशा इतर संघांच्या गुण सरासरीवर अवलंबून आहेत. चेक रिपब्लिक आणि इंग्लंड या दोन्ही संघाने या सामन्यासाठी चेक ४-२-३-१ अशी रणनीती आखली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 10:32 am

Web Title: euro cup 2020 croatia beat scotland 3 1 srk 94
टॅग : Euro Cup 2020,Sport
Next Stories
1 कसोटीतील रंगत कायम!
2 भारताबाबत कोणताही भेदभाव नाही!
3 दक्षिण आफ्रिकेचे निर्भेळ यश
Just Now!
X