नेदरलँडने नॉर्थ मसेडोनिया संघाला ३-० ने पराभूत केलं आहे. नेदरलँडचा या स्पर्धेतील सलग तिसरा विजय आहे. तर नॉर्थ मसेडोनिया संघाला या स्पर्धेत एकही सामना जिंकता आला नाही. दुसऱ्या सत्रात नेदरलँडच्या जिआर्जिओनो विजनल्डमने याने ५१ व्या मिनिटाला गोल मारत संघाला २-० ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर बरोबरी करताना नॉर्थ मसेडोनिया संघाची चांगलीच दमछाक झाली. त्यानंतर लगचेच ५८ व्या मिनिटाला पुन्हा एकदा जिआर्जिओनो विजनल्डमने गोल मारत संघाला तिसरी आघाडी मिळवून दिली. जिआर्जिओनो विजनल्डमने या सामन्यात दोन गोल मारले.

पहिल्या सत्रात नेदरलँडने नॉर्थ मसेडोनिया संघावर १ गोलची आघाडी मिळवली होती. नेदरलँडच्या मेम्पिस डिपेने २४ व्या मिनिटाला गोल झळकावला होता. या गोलमुळे नॉर्थ मसेडोनिया संघावर दडपण आलं होतं. सामना वाचवण्याासाठी नॉर्थ मसेडोनिया संघाची धडपड सुरु होती. मात्र त्यांना अपयश आलं.

या सामन्यासाठी नॉर्थ मसेडोनिया संघाने ४-२-३-१ अशी रणनिती आखली होती. तर नेदरलँडने ३-४-१-२ अशी व्यूहरचना आखली होती. पहिल्या सत्रात नेदरलँडच्या ताब्यात ५५ टक्के फुटबॉल होता. त्यात २९५ वेळा खेळाडूंनी एकमेकांकडे पास केला. यात फुटबॉल पासची अचूकता ८३ टक्के इतकी होती. तर नॉर्थ मसेडोनियाच्या ताब्यात ४५ टक्के फुटबॉल होता. २४५ वेळा फुटबॉल खेळाडूंनी एकमेकांकडे पास केला. फुटबॉल पास अचूकता ८४ टक्के इतकी होती. नॉर्थ मसेडोनियाच्या एका खेळाडूला गैरवर्तन केल्याने पिवळं कार्ड दाखवण्यात आलं .

नेदरलँड विरुद्ध नॉर्थ मसेडोनिया हा सामना केवळ औपचारिकता होता. नेदरलँडने सलग दोन सामने जिंकल्याने त्यांचं बाद फेरीतील स्थान निश्चित झालं होतं. तर नॉर्थ मसेडोनियाचा सलग दोन सामन्यात पराभव झाल्याने स्पर्धेबाहेर गेला होता.

नेदरलँड नॉर्थ मसेडोनिया संघाविरुद्ध कधीच पराभूत झालेला नाही. मागच्या चार सामन्यात नेदरलँडला दोन सामन्यात विजय, तर दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.