News Flash

Euro Cup 2020 : ऑस्ट्रियाला हरवून इटलीची उपांत्यपूर्व फेरीत धडक; अतिरिक्त वेळेत २-१ने पराभव

सलग बाराव्या सामन्यात इटलीच्या संघाने विजय मिळवला आहे.

विजयानंतर इटलीच्या संघाने आनंद साजरा केला (सौजन्य: रॉयटर्स)

यूरो कप २०२०च्या उपांत्यपूर्व फेरीत इटली आणि डेन्मार्कने स्थान मिळवले आहे. वेल्सच्या गॅरेथ बेले आणि रामसे या सुपरस्टार खेळाडूंना शांत ठेवत, डेन्मार्कने ४-० असा विजय मिळवला तर अतिरिक्त वेळेत झालेल्या रोमांचकारी सामन्यात इटलीने ऑस्ट्रियाचा २-१ ने पराभव केला. ऑस्ट्रियाने पहिल्यांदा युरो चषकाच्या बाद सामन्यांमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर सलग बाराव्या सामन्यात इटलीच्या संघाने विजय मिळवला आहे.

इटलीच्या चिया आणि पेसिनाकडून गोल

इटलीने या सामन्यात ऑस्ट्रियाचा २-१ने पराभव केला. हा संघाचा सलग १२ वा विजय होता. इटलीकडून फ्रेडरिक चियासाने ९५ व्या मिनिटाला अतिरिक्त वेळेत आणि पेसिनाने १०५ व्या मिनिटाला गोल केला. त्याच वेळी ११४ व्या मिनिटाला ऑस्ट्रियाकडून कलाजीचने गोल करत पुनरागमन केले. मात्र, त्यानंतर दोन्हीकडून एकही गोल होऊ शकला नाही आणि अशा प्रकारे ऑस्ट्रियन संघ हरला.

हे ही वाचा >> Euro Cup 2020 : डेन्मार्कची उपांत्यपूर्व फेरीत धडक, वेल्सचा ४-० ने उडवला धुव्वा!

मागील ३१ सामन्यांपासून अजिंक्य आहे इटलीचा संघ

इटलीच्या संघाने मागील १८ युरो कप सामन्यांपैकी केवळ २ सामने गमावले आहेत. इटलीचा संघ मागील ३१ सामन्यांत अजिंक्य राहिला आहे. यावेळी संघाने २५ सामने जिंकले असून ५ सामने अनिर्णित राहिले आहेत. अखेरचा सामना इटलीचा संघ २०१८ मध्ये हरला होता. पोर्तुगालने त्यांचा पराभव केला होता. इटालियन संघ आता उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगाल आणि बेल्जियम यांच्यातील रविवारी होणाऱ्या सामन्याच्या विजेत्या संघाशी सामना करेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 9:48 am

Web Title: euro cup 2020 italy beat austria in the final defeated 2 1 in extra time abn 97
टॅग : Euro Cup 2020
Next Stories
1 डेन्मार्कचा वेल्सला दणका
2 आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स  स्पर्धा : हिमा ऑलिम्पिक स्पर्धेला मुकणार?
3 लुकाकू लकाकणार?
Just Now!
X