News Flash

Euro Cup 2020: नेदरलँडचा सलग तिसरा विजय; नॉर्थ मसेडोनियाचा ३-० ने पराभव

यूरो कप २०२० स्पर्धेत नेदरलँड संघाची विजयी घोडदौड कायम आहे. नेदरलँड संघाने स्पर्धेत तिसरा विजय मिळवला आहे.

यूरो कप स्पर्धेत नेदरलँडचा सलग तिसरा दिवस (Photo- UEFA EURO 2020/ Twitter)

यूरो कप २०२० स्पर्धेत नेदरलँड संघाची विजयी घोडदौड कायम आहे. नेदरलँड संघाने स्पर्धेत तिसरा विजय मिळवला आहे. तर नॉर्थ मसेडोनिया संघाला या स्पर्धेत एकही सामना जिंकता आला नाही. त्यामुळे स्पर्धेतील आव्हानं संपुष्टात आलं आहे. नेदरलँडकडून मेम्पिस डिपेने १, तर जिआर्जिओनो विजनल्डमने दोन गोल झळकावले. यामुळे नेदरलँडने नॉर्थ मसेडोनिया संघाचा ३-० ने पराभव केला.

नेदरलँड संघाने पहिल्या सत्रापासूनच नॉर्थ मसेडोनिया संघावर आघाडी मिळवली होती. पहिल्या सत्रात मेम्पिस डिपेने १ गोल झळकावल्याने नॉर्थ मसेडोनिया संघावर दडपण आलं होतं. हे दडपण दुसऱ्या सत्रापर्यंत कायम राहिलं. पहिल्या सत्रात नेदरलँडच्या ताब्यात ५५ टक्के फुटबॉल होता. त्यात २९५ वेळा खेळाडूंनी एकमेकांकडे फुटबॉल पास केला. यात फुटबॉल पासची अचूकता ८३ टक्के इतकी होती. तर नॉर्थ मसेडोनियाच्या ताब्यात ४५ टक्के फुटबॉल होता. २४५ वेळा फुटबॉल खेळाडूंनी एकमेकांकडे पास केला. फुटबॉल पासची अचूकता ८४ टक्के इतकी होती. नॉर्थ मसेडोनियाच्या एका खेळाडूला गैरवर्तन केल्याने पिवळं कार्ड दाखवण्यात आलं.

दुसऱ्या सत्रात नेदरलँडच्या जिआर्जिओनो विजनल्डमने याने ५१ व्या मिनिटाला गोल मारत संघाला २-० ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर बरोबरी करताना नॉर्थ मसेडोनिया संघाची चांगलीच दमछाक झाली. त्यानंतर लगचेच ५८ व्या मिनिटाला पुन्हा एकदा जिआर्जिओनो विजनल्डमने गोल मारत संघाला तिसरी आघाडी मिळवून दिली. जिआर्जिओनो विजनल्डमने या सामन्यात दोन गोल मारले.

नेदरलँड नॉर्थ मसेडोनिया संघाविरुद्ध कधीच पराभूत झालेला नाही. मागच्या चार सामन्यात नेदरलँडला दोन सामन्यात विजय, तर दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 11:53 pm

Web Title: euro cup 2020 netherland defeat north macedonia rmt 84
टॅग : Euro Cup 2020
Next Stories
1 VIDEO : केशव महाराजची हॅट्ट्रिक! तब्बल ६१ वर्षानंतर बदलला दक्षिण आफ्रिकेचा इतिहास
2 Euro Cup 2020 : ऑस्ट्रियाच्या आक्रमणापुढे युक्रेन गपगार!
3 Euro cup 2020: नेदरलँडची विजयी घोडदौड कायम; नॉर्थ मसेडोनियावर ३-० ने विजय
Just Now!
X