News Flash

Euro Cup 2020 स्पर्धेतील बाद फेरीचं ठरलं! ‘या’ १६ संघात रंगणार लढती

इटली, बेल्जियम, नेदरलँड या संघांनी सर्वप्रथम बाद फेरीत धडक मारली. त्यानंतर वेल्स, डेन्मार्क, स्पेन, इंग्लंड आणि स्वीडन संघांनी बाद फेरीत आपलं स्थान निश्चित केलं.

पोर्तुगाल, फ्रान्स आणि जर्मनीसह १६ संघांचं बाद फेरीतील स्थान निश्चित (Photo: UEFA EURO 2020/ Twitter)

यूरो कप २०२० स्पर्धेच्या साखळी फेरीतील सामने संपल्यानंतर आता बाद फेरीतील सामन्यांसाठी १६ संघ सज्ज झाले आहेत. या १६ संघांमध्ये चषकासाठी लढत रंगणार असून यातून उपांत्यपूर्व फेरीत संघ पोहोचणार आहेत. साखळी फेरीत एकही सामना न गमवणाऱ्या इटली, बेल्जियम, नेदरलँड या संघांनी सर्वप्रथम बाद फेरीत धडक मारली. त्यानंतर वेल्स, डेन्मार्क, चेक रिपब्लिक, क्रोएशिया, स्पेन, इंग्लंड आणि स्वीडन संघांनी बाद फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. त्यानंतर साखळी फेरीत रंगलेल्या खडतर अशा ‘फ’ गटातून बाद फेरीत कोणता संघ हजेरी लावतो याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता होती. पोर्तुगाल विरुद्ध फ्रान्स आणि जर्मनी विरुद्ध हंगेरी हे दोन्ही सामने बरोबरीत सुटले. शेवटच्या क्षणांपर्यंत चारही संघ विजयी गोल मारण्यासाठी धडपड करताना दिसले. अखेर त्यांना अपयश आल्याने अखेर सामने बरोबरीत सुटले. या गटातून फ्रान्स, जर्मनी आणि पोर्तुगाल संघाची बाद फेरीत वर्णी लागली.

यूरो कप २०२० स्पर्धेतील बाद फेरीतील सामने

  • वेल्स विरुद्ध डेन्मार्क (२६ जून, रात्री ९.३० वाजता)
  • इटली विरुद्ध ऑस्ट्रिया (२७ जून, मध्यरात्री १२.३० वाजता)
  • नेदरलँड विरुद्ध चेक रिपब्लिक (२७ जून, रात्री ९.३० वाजता)
  • बेल्जियम विरुद्ध पोर्तुगाल (२८ जून, मध्यरात्री १२.३० वाजता)
  • क्रोएशिया विरुद्ध स्पेन (२८ जून, रात्री ९.३० वाजता)
  • फ्रान्स विरुद्ध स्वित्झर्लंड (२९ जून, मध्यरात्री १२.३० वाजता)
  • इंग्लंड विरुद्ध जर्मनी (२९ जून, रात्री ९.३० वाजता)
  • स्वीडन विरुद्ध युक्रेन (३० जून, मध्यरात्री १२.३० वाजता)

गुण सरासरीनुसार ‘अ’ गटातील स्वित्झर्लंड संघाचं बाद फेरीतील स्थान निश्चित झालं आहे. स्वित्झर्लंडने साखळी फेरीत वेल्ससोबतचा सामना १-१ ने बरोबरी सोडवला होता. त्यानंतर इटलीकडून ३-० ने पराभव सहन करावा लागला होता. टर्कीविरुद्धच्या सामन्यात जोरदार कमबॅक करत स्वित्झर्लंडने टर्कीचा ३-१ ने पराभव केला होता. तर युक्रेन संघाचंही गुण सरासरीनुसार बाद फेरीतील स्थान निश्चित झालं आहे. युक्रेन साखळी फेरीतील दोन सामने पराभूत झाला होता. नेदरलँडने ३-२ ने, तर ऑस्ट्रियाने १-० ने पराभूत केलं होतं. तर नॉर्थ मसेडोनिया संघाला युक्रेननं २-१ ने पराभूत केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2021 3:41 am

Web Title: euro cup 2020 these 16 team qualified for round 16 next level rmt 84
टॅग : Euro Cup 2020
Next Stories
1 यूरो कप २०२०: फ्रान्स, पोर्तुगाल आणि जर्मनीची बाद फेरीत धडक
2 ICC WTC 2021 Final : भारताला जगज्जेतेपदाची हुलकावणी!
3 Euro cup 2020 : क्रोएशिया, इंग्लंडची बाद फेरीत धडक
Just Now!
X