News Flash

मुरेच्या गोलमुळं वेल्सचं कमबॅक, स्वित्झर्लंडविरुद्धचा सामना सुटला बरोबरीत

यूरो कप २०२० स्पर्धेतील 'अ' गटातील वेल्स आणि स्वित्झर्लंड संघातील सामना बरोबरीत सुटला. मुरेच्या गोलमुळं वेल्सला बरोबरी साधता आली.

मुरेच्या गोलमुळं वेल्सचं कमबॅक, स्वित्झर्लंडविरुद्धचा सामना सुटला बरोबरीत (Twitter/Euro2020)

यूरो कप २०२० स्पर्धेतील ‘अ’ गटातील वेल्स आणि स्वित्झर्लंड संघातील सामना बरोबरीत सुटला. दोन्ही संघाची विजय मिळवण्यासाठी धडपड सुरु होती. मात्र १-१ गोलवर दोन्ही संघांना समाधान मानावं लागलं. पहिल्या सत्रात दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही. मात्र दुसऱ्या सत्रात दोन्ही संघानी एक-एक गोल नोंदवला. स्वित्झर्लंडने पहिल्या गोल नोंदवल्यानंतर वेल्स संघावर दडपण आलं होतं. मात्र ७४ व्या मिनिटाला किफर मुरेने गोल करत सामन्यात बरोबरी साधली. सामन्यात सहा मिनिटांचा अतिरिक्त कालावधीही देण्यात आला. मात्र दोन्ही संघ विजयी गोल नोंदवण्यात अपयशी ठरले. हा सामना बरोबरीत सुटल्याने अ गटातील गुणतालिकेत फारसा फरक पडला नाही. इटलीने तुर्कीवर मिळवलेल्या विजयानंतर ३ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर वेल्स आणि स्वित्झर्लंड १-१ गुणांसह बरोबरीत आहेत. तर तुर्कीला पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागल्याने चौथ्या स्थानावर आहे.

दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाला तेव्हा ४९ व्या मिनिटावर स्वित्झर्लंडच्या ब्रील एम्बोला याने गोल केला होता. त्यामुळे वेल्स संघावर दडपण आल्याने वेल्स संघाचे खेळाडू गोलसाठी धडपड करत होते. मात्र मुरेने गोल केला आणि खेळाडूंना सुटकेचा निश्वास सोडला.

या सामन्यात एकूण तीन खेळाडूंना पिवळं कार्ड दाखवण्यात आलं. यात स्वित्झर्लंडच्या दोन, तर वेल्सच्या एका खेळाडूचा समावेश आहे. पहिल्या सत्रात स्वित्झर्लंडच्या फॅबियन शार याला त्याच्या मैदानात केलेल्या कृत्याबद्दल रेफरीने पिवळं कार्ड दाखववलं. दुसऱ्या सत्रात ४७ व्या मिनिटाला वेल्सच्या किफर मुरे याने केलेल्या कृत्याबद्दल मॅच रेफरीने त्याला पिवळं कार्ड दाखवलं आहे. त्यानंतर ६३ व्या मिनिटाला स्वित्झर्लंडच्या केविन म्बाबूने केलेल्या कृतीला मॅच रेफरीने पिवळं कार्ड दाखवलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 9:20 pm

Web Title: euro cup 2020 wales match against switzerland ended with a draw rmt 84
टॅग : Euro Cup 2020
Next Stories
1 Euro Cup 2020 : डेन्मार्कचा फुटबॉलपटू मैदानात कोसळला, फिनलँडविरुद्धचा सामना स्थगित
2 आनंदाची बातमी..! भारताची महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र
3 अनुष्कासोबत असूनही विराटला आठवलं आपलं पहिलं प्रेम, इन्स्टाग्रामवर लिहिलं प्रेम पत्र!
Just Now!
X