सेंट पीटर्सबर्ग : युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्याच लढतीत रशियासमोर बलाढय़ बेल्जियमचे आव्हान असणार आहे. रशियाविरुद्धच्या याआधीच्या सातही सामन्यांत अपराजित राहणाऱ्या बेल्जियमचे पारडे या सामन्यात जड मानले जात आहे.

बेल्जियमने सोमवारी मैत्रीपूर्ण सामन्यात क्रोएशियाचा पराभव केला. इंटर मिलानचा आघाडीवीर रोमेलू लुकाकू याने केलेला गोल बेल्जियमच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरला. रशियाने अलेक्झांडर सोबोलेव्हच्या गोलमुळे बल्गेरियाचे आव्हान १-० असे परतवून लावले.

बेल्जियमने सलामीच्या लढतीसाठी लुकाकू, टॉबी अल्डरवेइरेल्ड, यान वेटरेनघेन, थिबाऊट कर्टियस आणि यौरी तिलेमान्स या खेळाडूंना संधी दिली आहे. मात्र अ‍ॅक्सेल विटसेल, केव्हिन डे ब्रूयने आणि इडेन हझार्ड यांच्या समावेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

डेन्मार्कची गाठ फिनलँडशी

शनिवारी ब-गटात डेन्मार्कची लढत फिनलँडशी होणार आहे. डेन्मार्क संघात दमदार खेळाडूंचा भरणा असल्यामुळे या सामन्यात त्यांची बाजू वरचढ ठरू शकते. डेन्मार्कने फिनलँडविरुद्धच्या गेल्या ५९ सामन्यांपैकी ३८ सामने जिंकले आहेत. ख्रिस्तियन एरिक्सेन, मार्टिन ब्रेथवेट आणि यूस्सूफ पौलसेन यांच्यावर डेन्मार्कची भिस्त असेल. फिनलँडच्या टीमू पुक्की याला गेल्या आठवडय़ात दुखापत झाल्याने संघाच्या चिंता वाढल्या आहेत.

वेल्सचा सामना स्वित्र्झलडशी

२०१६मध्ये युरो चषकाची उपांत्य फेरी गाठणाऱ्या वेल्स संघाला शनिवारी स्वित्र्झलडशी लढत द्यावी लागेल. अ गटात अव्वल संघांचा भरणा असल्यामुळे बाद फेरी गाठण्याचे आव्हान या दोन्ही संघांसमोर असेल. गॅरेथ बेल आरोन रामसे आणि जो अलेन यांच्या कामगिरीवर वेल्स संघ अवलंबून आहे. स्वित्र्झलडला व्लादिमिर पेटकोव्हिच, मारियो गोरानोव्हिच यांच्याकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे.

९  वेळ : सायं. ६.३० वा.

वेल्स वि. स्वित्र्झलड

९  वेळ : रात्री ९.३० वा.

डेन्मार्क वि. फिनलँड

९  वेळ : मध्यरात्री १२.३० वा.

बेल्जियम वि. रशिया

’  थेट प्रक्षेपण : सोनी टेन २, सोनी टेन ३ (हिंदी) आणि एचडी वाहिन्या

सर्वोत्तम कामगिरी

’ ३ सर्वाधिक जेतेपदे : जर्मनी, स्पेन

’ ३ सर्वाधिक उपविजेतेपद : जर्मनी, रशिया

’ ६ सर्वाधिक अंतिम फेरी : जर्मनी

’ ९ सर्वाधिक उपांत्य फेरी : जर्मनी

’ १० सर्वाधिक सहभाग : जर्मनी

’ ४९ सर्वाधिक सामने : जर्मनी

’ २६ सर्वाधिक विजय : जर्मनी

’ ८६ सर्वाधिक गोल : फ्रान्स

’ १४ सर्वाधिक गोल : फ्रान्स

हे सामने चुकवू नका!

’ १३ जून      मध्यरात्री १२.३० वा.     बेल्जियम वि. रशिया

’ १३ जून      सायं. ६.३०  वा. इंग्लंड वि. क्रोएशिया

’ १६ जून      मध्यरात्री १२.३० वा.     फ्रान्स वि. जर्मनी

’ १७ जून      रात्री ९.३० वा.   डेन्मार्क वि. बेल्जियम

’ १८ जून      रात्री ९.३० वा.   क्रोएशिया वि. चेक प्रजासत्ताक

आव्हानात्मक गट

फ-गटाला यंदाच्या युरोमधील सर्वात आव्हानात्मक गट मानले जाते. या गटात फ्रान्स (जागतिक क्रमवारीत : २), पोर्तुगाल (५),  जर्मनी (१२) आणि हंगेरी (३७) यांचा समावेश आहे.

वैयक्तिक कामगिरी

३ सर्वाधिक सलग स्पर्धामधील सहभाग : रेनर बॉनहॉफ (जर्मनी)

५  सर्वाधिक स्पर्धामधील सहभाग : इकर कॅसियास (स्पेन)

२१ सर्वाधिक सामने : ख्रिस्तियानो रोनाल्डा (ब्राझिल)

९ सर्वाधिक गोल: मायकेल प्लाटिनी (फ्रान्स)

लक्षवेधी फुटबॉलपटू

किलियन एम्बापे (फ्रान्स)

हॅरी केन (इंग्लंड)

ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल)

रोबटरे लेवांडोव्हस्की (पोलंड)

टोनी क्रूस (जर्मनी)