24 September 2020

News Flash

युरोपा लीग फुटबॉल : सेव्हिया, वोल्व्हस उपांत्यपूर्व फेरीत

बायर लेव्हरक्यूसेन आणि बॅसेल यांनीही अंतिम आठ संघांतील स्थान पक्के केले.

संग्रहित छायाचित्र

 

सेव्हिया आणि वोल्व्हरहॅम्पटन वँडर्स फुटबॉल क्लब (वोल्व्हस) या संघांनी युरोपा लीग फुटबॉलची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याशिवाय बायर लेव्हरक्यूसेन आणि बॅसेल यांनीही अंतिम आठ संघांतील स्थान पक्के केले.

करोनाच्या साथीमुळे मार्चपासून ठप्प पडलेल्या युरोपा लीगला बुधवारपासून पुन्हा प्रारंभ झाला. सेव्हियाने उपउपांत्यपूर्व सामन्यात रोमाला २-० असे पराभूत केले. सर्जियो रेग्युलन (२१वे मिनिट) आणि योसेफ अन्सारी (४४) यांनी सेव्हियासाठी प्रत्येकी एक गोल नोंदवला. पराभवामुळे रोमाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून सेव्हियासमोर उपांत्यपूर्व फेरीत वोल्व्हसचे आव्हान असेल. वोल्व्हसने ऑलिम्पियाकोसवर १-० असा विजय मिळवला. पॉल जिमिनेजने वोल्व्हससाठी पेनल्टीवर एकमेव गोल केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 12:18 am

Web Title: europa league football sevilla wolves in the semifinals abn 97
Next Stories
1 सिंधू, प्रणीत, सिक्की यांचा चार महिन्यांनी सरावाला प्रारंभ
2 “पाकिस्तानी क्रिकेटपटू काहीही बडबड करतात”
3 T20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच!
Just Now!
X