28 November 2020

News Flash

युरोपा लीग फुटबॉल : आर्सेनल, टॉटनहॅम, लेव्हरक्युसेनचे विजय

करिब बेलार्बीच्या दोन गोलांचे योगदान लेवरक्युसेनच्या विजयात मोलाचे आहे.

(संग्रहित छायाचित्र)

कार्लोस विनिसियसच्या दोन गोलांच्या पासच्या जोरावर टॉटनहॅमने युरोपा लीग फुटबॉलमध्ये लास्कवर ३-० असा विजय मिळवला. स्पर्धेत मोठय़ा विजयाची नोंद बायर लेवरक्युसेनने नीसवर ६-२ असा विजय मिळवत केली.

करिब बेलार्बीच्या दोन गोलांचे योगदान लेवरक्युसेनच्या विजयात मोलाचे आहे. १६व्या मिनिटालाच लेवरक्युसेन २-० आघाडीवर होते. नीसकडूनही दोन गोल झाले. मात्र लेवरक्युसेनने सवोत्तम कामगिरी करत सहा गोल झळकावले. १७ वर्षीय फ्लोरियन विट्र्झनेही बदली खेळाडू म्हणून येत लेवरक्युसेनसाठी गोल केला.

आर्सेनलने रॅपिड व्हिएन्नाला २-१ असे पराभूत करत या लीगमध्ये सलग चौथा विजय नोंदवला. आर्सेनल संघ रॅपिड व्हिएन्नाविरुद्धच्या लढतीत ५१व्या मिनिटाला पिछाडीवर पडला होता. मात्र आर्सेनलकडून डेव्हिड लुइझ (७०वे मिनिट) आणि पियरी ऑबॉमेयांग (७४वे मिनिट) यांनी गोल केल्याने त्यांना विजय नोंदवता आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 12:23 am

Web Title: europa league football victory for arsenal tottenham leverkusen abn 97
Next Stories
1 नेशन्स चषक बुद्धिबळ स्पर्धा : भारताचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत
2 ला-लीगा फुटबॉल : ‘एल क्लासिको’ लढतीला प्रेक्षकांची अनुपस्थिती
3 शुभेच्छांबद्दल आभार, लवकरच बरा होईन ! कपिल देव यांनी ट्विट करुन दिली माहिती
Just Now!
X