बिहार क्रिकेट असोसिएशनचे सचिव आदित्य वर्मा एन. श्रीनिवासन यांच्याविरोधात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेले एन. श्रीनिवासन यांनी आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधित्त्व केल्यास सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे वर्मा यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर श्रीनिवासन यांनी आयसीसीच्या बैठकीत उपस्थित राहणे योग्य नाही.