News Flash

अखेर कॅरेबियन बेटांवर भारताची विजयी बोहनी कोहलीचे शानदार शतक

वेस्ट इंडिजविरुद्ध १०२ धावांनी दणदणीत विजय मिळवून तूर्तास तरी भारतीय संघाने तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेतील आव्हान टिकवले आहे. कप्तान विराट कोहलीच्या शानदार शतकामुळे भारताला हा

| July 7, 2013 04:59 am

वेस्ट इंडिजविरुद्ध १०२ धावांनी दणदणीत विजय मिळवून तूर्तास तरी भारतीय संघाने तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेतील आव्हान टिकवले आहे. कप्तान विराट कोहलीच्या शानदार शतकामुळे भारताला हा विजय साकारता आला.
कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील १४वे शतक साजरे केल्यामुळे भारताला ७ बाद ३११ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुइस नियमानुसार, वेस्ट इंडिजपुढे विजयासाठी ३९ षटकांत २७४ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. परंतु विंडीजचा डाव फक्त ३४ षटकांत १७१ धावांत भारतीय गोलंदाजांनी गुंडाळून एका बोनस गुणाची कमाईसुद्धा केली. पहिल्या दोन सामन्यांतील पराभवांनंतर कॅरेबियन बेटांवर भारतीय संघाने आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
      कर्णधार म्हणून हा माझा दुसरा सामना होता आणि माझे शतक साजरे झाले. वैयक्तिक शतकापेक्षाही भारताला बोनस गुणासहित विजय मिळवता आला, याचा मला अतिशय आनंद झाला आहे!
– विराट कोहली,
भारताचा कर्णधार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2013 4:59 am

Web Title: eventually india opens win at caribbean islands
टॅग : Tri Series
Next Stories
1 झेल सुटल्यामुळे जडेजा-रैनात तू तू-मैं मैं
2 श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याला ब्राव्हो मुकणार
3 वेस्ट इंडिजला अंतिम फेरीची उत्सुकता श्रीलंकेची आव्हान टिकविण्यासाठी धडपड
Just Now!
X