जगभरासह भारतात सध्या करोना विषाणूमुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखत भारतासह सर्व देशांनी आपल्या क्रीडा स्पर्धा अनिश्चीत काळासाठी रद्द केल्या आहेत. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धाही बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. तेराव्या हंगामासाठीच्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सवर कोलकाता नाईट रायडर्स संघाने १५.५० कोटींपेक्षा जास्त रक्कम मोजत सर्वाधिक बोली लावली. आयपीएलचं भवितव्य सध्या अंधारात दिसत असलं तरीही पॅट कमिन्स आणि त्याचे सहकारी तेराव्या हंगामाबद्दल आशावादी आहेत.

अवश्य वाचा – खेळ नाही, तर पैसेही नाही ! आयपीएल रद्द झाल्यास खेळाडूंना बसणार मोठा फटका

“यंदाच्या हंगामातली आयपीएल स्पर्धा खेळवली जावी यासाठी माझ्यासकट सर्वजण उत्सुक आहेत. पण यामध्ये करोनाची लागण होणार नाही ही काळजी घेणं सर्वात महत्वाचं आहे.” ऑस्ट्रेलियातील स्थानिक वृत्तपत्रांशी बोलत असताना कमिन्सने आपलं मत मांडलं. काही दिवसांपूर्वी आपलं कोलकात्याच्या संघ प्रशासनातील काही व्यक्तींशी बोलणं झालं होतं, त्यावेळी ते स्पर्धेबद्दल आश्वासक वाटत होते असंही कमिन्स म्हणाला.

अवश्य वाचा – RCB अजुन आयपीएल कसं जिंकू शकली नाही?? पिटरसनच्या प्रश्नाला कोहलीने दिलं उत्तर…

दरम्यान बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या कार्यकाळात आयपीएल खेळवण्याचा विचार आहे. मात्र यासाठी बीसीसीआयला आयसीसीच्या दरबारी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. देशातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्ण सापडत आहेत, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

अवश्य वाचा – देशावर करोनाचं संकट, मात्र राजस्थान रॉयल्सचे अधिकारी आयपीएलसाठी उत्सुक