वेस्ट इंडिजचा सलामीवीर इव्हिन लुईस याने वैयक्तिक कारणास्तव भारत दौऱ्यातून माघार घेतल्याने पाहुण्या संघाच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. लुईसने अलीकडेच वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने सादर केलेल्या मध्यवर्ती करारावर स्वाक्षऱ्या करण्यास नकार दिला होता. ख्रिस गेल आणि अन्य क्रिकेटपटूंसह त्याने जगभरातील लीग खेळण्यास पसंती दर्शवली होती.

लुईसच्या जागी आता वेस्ट इंडिज संघात कायरन पॉवेलचा एकदिवसीय संघात तर निकोलस पूरन याचा ट्वेन्टी-२० संघात समावेश करण्यात आला आहे. अननुभवी वेगवान गोलंदाज ओबेड मॅककॉय याला दोन्ही संघात स्थान देण्यात आले आहे. भारताविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला २१ ऑक्टोबरपासून गुवाहाटी येथे सुरुवात होणार आहे.

वेस्ट इंडिजचा एकदिवसीय संघ : जेसन होल्डर (कर्णधार), फॅबियन अ‍ॅलेन, सुनील अम्ब्रिस, देवेंद्र बिशू, चंद्रपाल हेमराज, शिमरॉन हेटमेयर, शाय होप, ओबेड मॅककॉय, अ‍ॅशले नर्स, किमो पॉल, कायरन पॉवेल, रोवमन पॉवेल, केमार रोच, मार्लन सॅम्यूएल्स, ओशेन थॉमस.

ट्वेटी-२० संघ : कालरेस ब्रेथवेट (कर्णधार), फॅबियन अ‍ॅलेन, डॅरेन ब्राव्हो, शिमरॉन हेटमेयर, ओबेड मॅककॉय, अ‍ॅशले नर्स, किमो पॉल, खारी पाएरे, किरॉन पोलार्ड, निकोलस पूरन, रोवमन पॉवेल, दिनेश रामदिन, आंद्रे रस्सेल, शेरफने रुदरफोर्ड, ओशेन थॉमस.