News Flash

पतीला मारहाण केल्याची हिंगिसविरुद्ध तक्रार

माजी ग्रँडस्लॅम विजेती टेनिसपटू मार्टिना िहगिस ही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिच्याविरुद्ध मारहाणीची तक्रार तिचा पती थिबॉल्ट ह्य़ुटीन याने केली आहे.

| September 28, 2013 01:45 am

माजी ग्रँडस्लॅम विजेती टेनिसपटू मार्टिना िहगिस ही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिच्याविरुद्ध मारहाणीची तक्रार तिचा पती थिबॉल्ट ह्य़ुटीन याने केली आहे. हिंगिस, तिची आई व तिच्या आईचा मित्र आपल्याला मारहाण करीत असल्याची तक्रार ह्य़ुटीन यांनी पोलिसांकडे दिली आहे. आपल्याला जड वस्तूने मारहाण झाली आहे. आपल्या जिवाला या तीन व्यक्तींकडून धोका असून आपल्याला संरक्षण द्यावे, अशीही त्याने विनंती केली आहे. यापूर्वी ह्य़ुटीन याने एका पत्रकार परिषदेत हिंगिस ही विक्षिप्त स्वभावाची खेळाडू असल्याचे मत व्यक्त केले होते. ह्य़ुटीन हा फ्रान्सचा इक्वेस्ट्रीयनपटू आहे. ह्य़ुटीन याने दिलेल्या तक्रारीबाबत पोलिसांचे प्रवक्ते डेव्हिड मिनॉल यांनी सांगितले, या तक्रारीबाबत आम्ही चौकशी सुरू केली आहे. या संदर्भात हिंिगस हिची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही. ती सध्या टोकियो येथील स्पर्धेत सहभागी होणार होती, मात्र ऐन वेळी वैयक्तिक कारणास्तव तिने माघार घेतली असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2013 1:45 am

Web Title: ex tennis star martina hingis beat up husband with mother
Next Stories
1 जागतिक बॅडमिंटन क्रमवारी : सिंधू पुन्हा दहाव्या स्थानावर
2 स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धा : रोनाल्डोशाही!
3 सुल्तान जोहोर बाहरू हॉकी स्पर्धा : भारताकडून कोरियाचा धुव्वा
Just Now!
X