बांगलादेशविरुद्धची पहिली एकदिवसीय लढत आज
आयपीएलनंतर भारतीय संघ बांगलादेशच्या दौऱ्यासाठी सज्ज झाला असून सुरेश रैनाच्या कप्तानीखाली भारताचा संघ बांगलादेशविरुद्ध रविवारी पहिला सामना खेळणार आहे.
रैनाबरोबरच रॉबिन उथप्पा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, केदार जाधव, अंबाती रायुडु सारख्या खेळाडूंना वरिष्ठ संघात स्थान मिळविण्यासाठी ही सोनेरी संधी आहे. गोलंदाजीत अक्षर पटेल, अमित मिश्रा, मोहित शर्मा, आर. विनयकुमार, परवेझ रसूल यांच्याकडून भारताला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. बांगलादेश संघाला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. मुशफिकर रहीम याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या बांगलादेशकडे अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. तमिम इक्बाल, अनामुल हक, अब्दुर रझाक, मश्रफी मोर्तझा यांच्यावर बांगलादेश संघाची कामगिरी अवलंबून आहे. बांगलादेशच्या खेळाडूंकडे घरच्या मैदानावर बलाढय़ संघांवर मात करण्याची क्षमता आहे.

दोन्ही संघ-भारत-सुरेश रैना (कर्णधार), रॉबिन उथप्पा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, मनोज तिवारी, केदार जाधव, अंबाती रायुडु, वृद्धिमान साह (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, अमित मिश्रा, मोहित शर्मा, आर.विनयकुमार, परवेझ रसूल, स्टुअर्ट बिन्नी.
बांगलादेश-मुशफिकर रहीम (कर्णधार), तमिम इक्बाल, अनामुल हक, शमसूर रहेमान, मोमिनुल हक, शेख अली हसन, नासिर हुसेन, महमदुल्ला, मिथुन अली, अब्दुर रझाक, मश्रफी मोर्तझा, सोहाग अली, झियाउर रेहमान, अल अमीन हुसेन, ताश्किन अहमद.