News Flash

VIDEO : महाराष्ट्राची ‘रौप्य’कन्या प्राजक्ताशी खास गप्पा

प्राजक्ता अंकोलेकरने साधला लोकसत्ता.कॉमशी संवाद

तायक्वांडोपटू प्राजक्ता अंकोलेकर

नेपाळच्या काठमांडूमध्ये नुकत्याच दक्षिण आशियाई क्रीडा (SAF) स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत भारतीय चमूचे वर्चस्व राहिले. भारताने या स्पर्धेत एकूण ३१२ पदके मिळवली. यामध्ये भारताने १७४ सुवर्ण, ९३ रौप्य आणि ४५ कांस्यपदकांची कमाई केली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कन्येने राज्याची मान उंचावली. तायक्वांडो क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या प्राजक्ता अंकोलेकर हिने रौप्यपदकाची कमाई केली. तिने तिचा या स्पर्धेतील अनुभव, तिचा एकंदरीत झालेला क्रीडा प्रवास आणि तिच्या स्वप्नांबद्दल लोकसत्ता.कॉमशी संवाद साधला.

 

प्राजक्ताने या आधी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यापैकी आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये तिने कांस्यपदकाची कमाई केली होती. या मुलाखतीच्या वेळी तिचे प्रशिक्षक सुभाष पाटील हेदेखील उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 6:50 pm

Web Title: exclusive interview of maharashtra girl prajakta ankolekar who won silver medal for india in taekwondo in south asian games
Next Stories
1 Video : पोलार्डचा नादच खुळा! बसून मारला उत्तुंग षटकार
2 Ranji Trophy 2019 : खडुस आर्मीची धडाकेबाज सुरुवात, बडोद्यावर ३०९ धावांनी केली मात
3 Video : भन्नाट…!!! कॅच घेण्याचा इतका चित्तथरारक प्रयत्न कधी पाहिलाय?
Just Now!
X