News Flash

अबब ! संघाच्या धावसंख्येपेक्षा अवांतर धावाच अधिक

अख्खा संघ अवघ्या १० धावांत गारद

(संग्रहित छायाचित्र)

टी-२० मध्ये अख्खा संघ अवघ्या १० धावांत गारद झाला आहे. ऑस्ट्रेलियातील महिला क्रिकेट लीगमध्ये संपूर्ण संघ 10 धावांत माघारी परतला आहे. यामधील सहा धावा अतिरिक्त आहे. ११ खेळाडूंनी मिळून फक्त चार धावा केल्या आहे. यासाठी त्यांनी तब्बल ६२ चेंडू खेळले आहेत. सोशल मीडियावर सध्या हा चर्चेचा विषय आहे. National Indigenous Cricket Championship या स्पर्धेमध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागले आहे.

दक्षिण ऑस्ट्रेलिया संघातील १० खेळाडूंना एकही धाव काढता आली नाही. सलामीवीर फेबी मॅन्सेलने सर्वाधिक चार धावा केल्या आहेत. न्यू साऊथ वेल्सच्या रोक्साने व्हॅन-व्हीन एक धाव देताना पाच फलंदाजांना तंबूद झाडले. नाओमी वूड्सने दोन चेंडूंत दोन विकेट घेतल्या. न्यू साऊथ वेल्स संघाने हा सामना सहज जिंकला. अवघ्या १५ चेंडूत बिनबाद सामना जिंकला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2019 5:32 pm

Web Title: extras top score as australian womens side all out for 10
Next Stories
1 IND vs NZ : अरेरे… भारताचा झाला सर्वात मानहानीकारक पराभव
2 थरारक झेल घेऊनही नेटकऱ्यांनी केलं कार्तिकला ट्रोल
3 Video : दिनेश कार्तिकने घेतलेला हा अफलातून झेल पाहिलात का?
Just Now!
X