जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

चित्तपावन ब्राह्मण संघ सभागृह येथे रंगलेल्या अध्यक्षीय चषक मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत फहीम काझी आणि नीलम घोडके यांनी अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीच्या विजेतेपदावर नाव कोरले.

वरळी स्पोर्ट्स क्लबच्या फहीमने अंतिम फेरीत रिझव्‍‌र्ह बँकेच्या विश्वविजेत्या प्रशांत मोरेला २५-४, १८-१५ असे पराभूत केले. महिलांमध्ये जैन इरिगेशनच्या नीलमने मिताली पिंपळेवर १४-४, २३-२१ अशी मात केली. कनिष्ठ गटात (१८ वर्षांखालील) अंकित मोहिते आणि सेजल लोखंडे यांनी अनुक्रमे मुला-मुलींच्या गटातील विजेतेपदाला गवसणी घातली.