पाकिस्तानचा सलामीवीर फखार झमान सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. झिम्बाब्वेविरुद्ध चौथ्या वन-डे सामन्यात द्विशतकी खेळी केल्यानंतर, अखेरच्या वन-डे सामन्यात फखारने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. वन-डे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद १ हजार धावा पूर्ण करण्याचा मान फखारने आपल्या नावे केला आहे. हा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी फखारला केवळ २० धावांची गरज होती, अखेरच्या सामन्यात ८५ धावांची खेळी करत फखारने हा विक्रम अखेर आपल्या नावे केला आहे. अखेरच्या सामन्यातही फखार शतकी खेळी करणार असं वाटत असतानाच तो माघारी परतला.

हा विक्रम करताना फखार झमानने वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू सर व्हिवीअन रिचर्ड्स, इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पिटरसन यांना मागे टाकलं आहे.
वन-डे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद १ हजार धावा करणारे फलंदाज –

१ – फखार झमान (२०१७ ते आजच्या दिवसापर्यंत*) – १८ डाव

२ – सर व्हिवीअन रिचर्ड्स (१९७५ ते १९८०) – २१ डाव
२ – केविन पिटरसन (२००४ ते २००६) – २१ डाव
२ – जोनाथन ट्रॉट (२००९ ते २०११) – २१ डाव
२ – क्विंटन डी कॉक (२०१३ ते २०१४) – २१ डाव
२ – बाबर आझम (२०१५ ते २०१७) – २१ डाव

३ – गॉर्डन ग्रिनीज (१९७५ ते १९८०) – २३ डाव
३ – रायन टेन डेशॉट (२००६ ते २००९) – २३ डाव
३ – अझर अली (२०११ ते २०१५) – २३ डाव

४ – ग्लेन टर्नर (१९७३ ते १९८३) – २४ डाव
४ – यासिर हमीद (२००३ ते २००४) – २४ डाव
४ – हाशिम आमला (२००८ ते २०१०) – २४ डाव
४ – विराट कोहली (२००८ ते २०१०) – २४ डाव
४ – शिखर धवन (२०१० ते २०१३) – २४ डाव

(वरील सर्व आकडेवारी ही २२ जुलै २०१८ पर्यंतची आहे)