दुसऱ्या सामन्यात भारतीय संघानं विजय मिळवत कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. ७ जानेवारीपासून सिडनी येथे तिसऱ्या कसोटीला प्रारंभ होणार आहे. सिडनीला पोहचण्यापूर्वी भारतीय खेळाडू मेलबर्न येथील एका हॉटेलात गेले. रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी हे चौघे मेलबर्नच्या हॉटेलमध्ये जेवले. पण त्याचवेळी एका चाहत्याने त्यांना पाहिल्यामुळे त्याने या चौघांचे बिल भरून टाकलं. या प्रकारानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्याला पैसे घेण्याचा आग्रह केला पण चाहत्याने पैसे न घेता केवळ सेल्फी क्लिक करवून घेतला. ही सारी कहाणी चाहत्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केली होती. पण या कहाणीतूनच त्याच्यावर स्पष्टीकरण देण्याची वेळ ओढवली.

रोहित, गिल आणि पंतच्या जेवणाचे चाहत्याने भरले पैसे…

चाहता नवलदीप सिंग या खेळाडूंच्या जवळच्या टेबलवरच चाहता बसला होता. त्याने भारतीय क्रिकेटपटूंना पाहिले, तेव्हा त्याला फार आनंद झाला. त्याने या खेळाडूंचा छोटा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला. नवलदीप आपल्या पत्नीसोबत जेवणासाठी त्या हॉटेलमध्ये गेलेला होता. त्यामुळे त्याने या खेळाडूंचं ६ हजार ६८३ रूपयांचं बिल भरून टाकलं. त्यानंतर केलेल्या अनेक ट्विट्सपैकी एका ट्विटमध्ये त्या चाहत्याला ऋषभ पंतने मिठी मारली असं नमूद करण्यात आलं होतं.

Good News! ‘टीम इंडिया’च्या शिलेदाराला कन्यारत्न प्राप्ती

करोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटपटूंना कोणालाही मिठी न मारण्याचे नियम घालून दिले आहेत. अशा स्थितीत त्याने असं कसं केलं? याबद्दल चर्चा सुरू झाली होती व पंत अडचणीत सापडणार अशी शंका होती. परंतु, नवलदीप सिंगने पुन्हा एक ट्विट करत या प्रकाराबाबत स्पष्टीकरण दिलं. पंतने मला मिठी मारलेली नाही. मी अतिशय आनंदी झालो होतो. त्यामुळे उत्साहाच्या भरात मी तसं लिहिलं होतं. पण तसं काहीही घडलं नाही, असं स्पष्टीकरण चाहत्याने दिलं.

Video: Mind It..!! वॉर्नरच्या ‘रजनीकांत’ अवतारावर चाहते फिदा

दरम्यान, ७ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या सामन्यात रोहित शर्मा उपकर्णधार असणार आहे तर दुखापतग्रस्त उमेश यादवच्या जागी टी नटराजनला चमूत स्थान मिळाले आहे.