News Flash

फॅनी डी व्हिलियर्स यांनी चोरी पकडली

दीड तासानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा रडीचा डाव टिपण्यात आम्हाला यश आले.

दक्षिण आफ्रिकेचे माजी गोलंदाज फॅनी डी व्हिलियर्स यांनी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा चेंडूत फेरफार करण्याचा रडीचा डाव पकडला. एका वृत्तवाहिनीसाठी समालोचन करताना डी व्हिलियर्स यांनी दूरचित्रवाणीसाठी चित्रण करणाऱ्याला ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सांगितले. रेडिओला दिलेल्या मुलाखतीत फॅनी डी व्हिलियर्स यांनी हा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, ‘‘ऑस्ट्रेलियाचे खेळाडू काही संशयास्पद करत असल्याचे आम्हाला वाटत होते. त्यामुळे चित्रण करणाऱ्याला त्यांच्यावरच कॅमेरा रोखून धरण्यास सांगितले. दीड तासानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा रडीचा डाव टिपण्यात आम्हाला यश आले. त्यातून बँक्रॉफ्टवर आम्ही लक्ष केंद्रित केले आणि त्यांचा हा रडीचा डाव जगासमोर आला.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 3:02 am

Web Title: fanie de villiers australia tampered ball
Next Stories
1 खेळाडूंवर टीका करताना तोल राखावा – स्टीव्ह वॉ
2 अ‍ॅशेस मालिकेतही चेंडूत फेरफार करण्याचे कृत्य – वॉन
3 बॉक्सिंगमध्ये पाच सुवर्णपदकांची आशा -पाटील
Just Now!
X