टीम इंडियाचा माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचे ‘बाईक’ प्रेम कुणापासून लपलेले नाही. रांची येथील त्याच्या फार्महाऊसमध्ये दुचाकींनी भरलेले गॅरेज आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) नेतृत्व करतो. याच CSK ने धोनीचा एक व्हिडीओ आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये धोनी आपल्या नव्या वाहनावर बसून फेरफटका मारण्याचा आनंद घेत होता. हे वाहन म्हणजे बाईक किंवा कार नव्हती, तर धोनी चक्क ट्रॅक्टर चालवत होता. सीएसकेने ट्विटरवर धोनीचा ट्रॅक्टर चालविण्याचा आनंद घेतनाचा व्हिडिओ पोस्ट केला होता.

चेन्नई सुपर किंग्जच्या व्हिडीओची दखल घेत अनेक प्रसारमाध्यमांनी धोनीच्या नव्या ट्रॅक्टर खरेदीचे वृत्त प्रसिद्ध केले होते. एका संकेतस्थळाने धोनीने महिंद्रा कंपनीचा स्वराज ट्रॅक्टर विकत घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिद्रा यांनी भन्नाट कमेंट करत धोनीची स्तुती केली होती. पण धोनीने ट्रॅक्टर का खरेदी केला? त्याचा उलगडा आता चाहत्यांना झाला. धोनीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यात धोनी आपल्या ट्रॅक्टरवर बसून फार्महाऊसच्या परिसरात ऑर्गनिक शेती करत आहे.

पाहा व्हिडीओ –

धोनीच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तो ऑर्गनिक शेती करताना दिसला. त्याच्या रांचीच्या फार्महाऊसमध्ये त्याने स्वत: ट्रॅक्टर चालवून शेतीची काही कामे केली.

दरम्यान, धोनीना महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर विकत घेतल्यानंतर स्वत: आनंद महिंद्रा यांनी धोनीची स्तुती केली होती. धोनीबद्दल ते म्हणाले होते, “मला आधीपासूनच माहिती होतं की धोनीची निर्णयक्षमता आणि अंदाज बांधण्याचे सामर्थ्य खूपच वाखाणण्याजोगे आहे.” त्यांच्या या कमेंटला हजारो लोकांनी लाईक केले होते.