12 August 2020

News Flash

एडल्जी यांची इंजिनीयर यांच्यावर टीका

इंजिनीयर यांनी मात्र घूमजाव करताना एडल्जी यांच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नसल्याचे सांगितले. ‘‘

| December 5, 2019 01:40 am

फारुख इंजिनीयर व डायना एडल्जी

मुंबई : भारताच्या माजी क्रिकेटपटू आणि प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडल्जी यांनी बुधवारी माजी यष्टीरक्षक फारुख इंजिनीयर यांच्यावर कडाडून टीका केली.

माजी क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत इंजिनीयर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याशिवाय एडल्जीसुद्धा या कार्यक्रमासाठी हजर होत्या. इंजिनीयर यांनी राष्ट्रीय क्रिकेट निवड समिती आणि एडल्जी यांचा समावेश असलेली प्रशासकीय समिती बिनकामाची आहे, अशी टीका केली. त्यामुळे एडल्जी यांनी इंजिनीयर यांच्यावर निशाणा साधला.

‘‘इंजिनीयर यांनी काही दिवसांपूर्वीच पुरुषांच्या राष्ट्रीय निवड समितीबाबत टीका केल्याचे माझ्या कानी आले. त्यामध्ये त्यांनी माझ्याबाबतीतही विधान केले होते. परंतु मी त्यांना सांगू इच्छिते की मी २० कसोटी सामने खेळलेली आहे. त्यामुळे हे फार कमी क्रिकेट नाही,’’ असे एडल्जी म्हणाल्या.

इंजिनीयर यांनी मात्र घूमजाव करताना एडल्जी यांच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नसल्याचे सांगितले. ‘‘माझ्या मनात जे होते, ते मी दिलखुलासपणे व्यक्त केले. परंतु यामुळे एडल्जीच्या भावना दुखावण्याचे माझे उद्दिष्ट नव्हते,’’ असे ८१ वर्षीय इंजिनीयर म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2019 1:40 am

Web Title: farokh engineer criticized by dyana edalji zws 70
Next Stories
1 आर्थर श्रीलंकेचे नवे प्रशिक्षक
2 ‘केपीएल’ सामनानिश्चिती प्रकरणी कार्यकारिणी सदस्याला अटक
3 Video : ‘धोनी गायी गाणे…..’; पहा माहीचा ‘सुपर-कूल’ अंदाज
Just Now!
X