भारतीय गोलंदाजीची भिस्त ही तशी फिरकीवरच. अनेक महान फिरकीपटू भारताला लाभले; पण गेल्या काही वर्षांमध्ये त्यामध्ये बदल झालेला पाहायला मिळाला आणि वेगवान गोलंदाज भारताला विजयाची संधी निर्माण करू लागले. याचे बरेचसे श्रेय द्यावे लागेल ते एमआरएफ पेस अकादमीला. भारतात फिरकीला पोषक खेळपट्टय़ा असल्या तरी त्यावर वेगवान गोलंदाज घडवण्याचे स्वप्न एमआरएफच्या मेमन बंधूंनी पाहिले आणि ते सत्यातही उतरवले. रवी मेमन हे यामागचे खरे सूत्रधार. १९८७ साली नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज डेनिस लिली यांना करारबद्ध करत अकादमीची स्थापना केली. रवी (३९ वर्षे) यांचे १९९० साली अकाली निधन झाले, पण त्यांनी बसवलेली ही घडी एवढी जबरदस्त होती की, अकादमी आजतागायत योग्य पद्धतीने सुरू असून वेगवान गोलंदाजांची ‘फॅक्टरी’ ठरत आहे. लिली यांनी तब्बल २५ वर्षे अकादमीचे संस्थापक पद सांभाळले आणि मग २०१२मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी महान गोलंदाज ग्लेन मॅक्ग्राच्या हाती सूत्रे सुपूर्द केली.
या अकादमीमध्ये आतापर्यंत लिली यांच्याबरोबर जेफ थॉमसन, इयान चॅपेल, ग्रेग चॅपेल, जोएल गार्नर आणि रॉडनी मार्श या आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज क्रिकेटपटूंना मार्गदर्शन देण्यासाठी बोलावण्यात आले होते. अल्पावधीतच ‘वेगवान गोलंदाजांची फॅक्टरी’ म्हणून ओळख निर्माण केल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अकादमीबरोबर करार केला. त्यानुसार देशातील बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त संघटनांतील गोलंदाजांना प्रशिक्षणासाठी अकादमीची दारे खुली करण्यात आली आहेत.

अकादमीचे वेगवान गोलंदाज
विवेक राझदान, जवागल श्रीनाथ, सुब्रतो बॅनर्जी, वेंकटेश प्रसाद, झहीर खान, इरफान पठाण, आर.पी. सिंग, एस. श्रीशांत, मुनाफ पटेल, टिनू योहानन, देबाशीष मोहंती, इक्बाल सिद्धिकी, डेव्हिड जॉन्सन, टी. कुमारन, हरविंदर सिंग, वरुण आरोन आणि ईश्वर पांडे.
विश्वचषकात महत्त्वाची कामगिरी
भारताने जिंकलेल्या २००७ आणि २०११च्या विश्वविजयात अकादमीतील वेगवान गोलंदाजांचा मोलाचा वाटा होता. या दोन्ही विश्वचषक विजयांत नेत्रदीपक कामगिरी करणारे तिन्ही वेगवान गोलंदाज अकादमीतीलच होते.

Jasprit Bumrah taking five wickets against RCB in IPL 2024
MI vs RCB : जसप्रीत बुमराह फलंदाजांसाठी इतका धोकादायक का आहे? आपल्या यशाचे गुपित स्वत:च केले उघड
Hayden gives batsman Tips to face Mayank
IPL 2024 : मयंक यादवचा झंझावात कसा रोखायचा? मॅथ्यू हेडनने फलंदाजांना दिला गुरुमंत्र
Mayank Yadav for bowling record 155 point 8 kmph against PBKS
Mayank Yadav : ‘… कुठे लपला होतास’, माजी दिग्गज डेल स्टेनकडून भारताच्या युवा वेगवान गोलंदाजाचे कौतुक
md siraj
बंगळुरूच्या गोलंदाजांकडून कामगिरीत सुधारणेची अपेक्षा! ‘आयपीएल’मध्ये आज पंजाब किंग्जचे आव्हान

अकादमीतील मार्गदर्शक
’ संस्थापकासह दोन साहाय्यक प्रशिक्षक
’ स्पोर्ट्स फिजिशियन
’ फिटनेस ट्रेनर ’ फिजिओथेरपिस्ट
’ योगा प्रशिक्षक ’ आहारतज्ज्ञ

’ चार टर्फ खेळपट्टय़ा
’ एकाग्रतेसाठी एक अ‍ॅस्ट्रोटर्फ खेळपट्टी
’व्यायामशाळा
’जलतरण तलाव
’दृक्-श्राव्य सोयींसाठी खास दालन
’क्रिकेट मैदानासह सरावासाठी बऱ्याच खेळपट्टय़ा

एमआरएफने घेतलेला वसा स्तुत्य आणि अद्भुत असाच आहे, कारण एवढी वर्षे सातत्याने एका गोष्टीसाठी झटत राहणे सोपे नाही. या अकादमीतून आलेल्या गोलंदाजांमध्ये अनोखी चमक पाहायला मिळते. यामधल्या बहुतांशी गोलंदाजांबरोबर मी खेळलो असल्यामुळे त्यांच्यातले वैविध्य मला पाहायला मिळाले. त्यांना मिळणाऱ्या सुविधा या उत्तम दर्जाच्या आहेत. आतापर्यंत त्यांनी बरेच गोलंदाज घडवले असून यापुढेही अकादमीतून वेगवान गोलंदाजांची फळी देशाला मिळेल, अशी आशा व्यक्त करतो.
– सचिन तेंडुलकर,
भारताचा माजी महान क्रिकेटपटू

या अकादमीमध्ये वेगवान गोलंदाजांना प्रशिक्षण देताना आनंद मिळतो. भारतामध्ये असा उपक्रम राबवणे नक्कीच स्तुत्य आहे. या अकादमीमध्ये गोलंदाजांची शैली बदलण्यात येत नाही, तर ती सुधारण्यात येते. भारतामध्ये वेगवान गोलंदाजीसाठी अमाप गुणवत्ता आहे, त्याला न्याय देण्याचे काम ही अकादमी करत आहे. आम्ही येथे मुलांना गोलंदाजीबरोबर शिस्त आणि खेळाची नीतिमूल्येही शिकवतो. यशाला शॉर्टकट नसतो, त्यामुळे आयपीएलपेक्षा देशासाठी खेळण्याला प्राधान्य द्यायला हवे, हेच आम्ही गोलंदाजांना सांगत असतो.
– ग्लेन मॅक्ग्रा,
ऑस्ट्रेलियाचा माजी महान गोलंदाज आणि अकादमीचा संस्थापक

अन्य देशांतील गोलंदाजांना प्रशिक्षण

या अकादमीमध्ये भारताबरोबरच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिजसारख्या देशांतील वेगवान गोलंदाजांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये ग्लेन मॅक् ग्रा, ब्रेट ली, मिचेल जॉन्सन, स्टीव्हन फिन, लान्स क्लुसनर, मखाया एन्टिनी, टीम साऊथी, सायमन जोन्स, रायन साइडबॉटम, चमिंडा वास, दिलहारा फर्नाडो या गोलंदाजांचा समावेश आहे.