सलामीवीर फैज फझल याने केलेल्या नाबाद शतकानेच विदर्भ संघास महाराष्ट्राविरुद्धच्या रणजी क्रिकेट लढतीत शुक्रवारी पहिल्या डावात ४ बाद २२७ धावांपर्यंत मजल गाठता आली.

घरच्या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर विदर्भची एक वेळ ३ बाद ७० अशी स्थिती होती. फझलने नाबाद ११० धावा करताना शलभ श्रीवास्तव याच्या साथीत शतकी भागीदारी रचली. त्यामुळेच विदर्भ संघाला आश्वासक सुरुवात करता आली. महाराष्ट्राकडून अक्षय दरेकर याने सर्वाधिक तीन बळी घेतले.
वासीम जाफर (०), गणेश सतीश (१२) व कर्णधार सुब्रमण्यम बद्रीनाथ (२७) हे तीन मोहरे तंबूत परतले. त्या वेळी विदर्भ संघास दोनशे धावांचा पल्ला गाठता येईल की नाही अशी शंका निर्माण झाली होती. मात्र फझल व श्रीवास्तव यांनी १५७ धावांची भागीदारी करीत संघाचा डाव सावरला. फाजल याने १४ चौकारांसह नाबाद ११० धावा केल्या. श्रीवास्तव याने केलेल्या ६३ धावांमध्ये सहा चौकारांचा समावेश होता. महाराष्ट्राकडून दरेकर याने ४९ धावांत तीन बळी घेतले तर श्रीकांत मुंडे व अनुपम संकलेचा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
विदर्भ पहिला डाव : ८८ षटकांत ४ बाद २२७ (फैज फाजल खेळत आहे ११०, शलभ श्रीवास्तव ६३, सुब्रमण्यम बद्रीनाथ २७, श्रीकांत मुंडे २/४२, अनुपम संकलेचा २/४५, अक्षय दरेकर ३/४९).