इटलीच्या ज्युवेन्ट्स क्लबचा ३-१ असा धुव्वा उडवत स्पेनच्या बार्सिलोना क्लबने यूएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे.
बर्लिनमधील ऑलिम्पिक स्टेडियमवर शनिवारी रात्री रंगलेल्या अंतिम सामन्यात सुआरेझ, नेयमार आणि मेस्सी यांसारखे मात्तब्बर खेळाडूंचा ताफा असलेला बार्सिलोना संघ वरचढ ठरला. तर ज्युवेन्ट्सनेही शेवटपर्यंत कडवी टक्कर दिली. सामन्याच्या चौथ्या मिनिटालाच इवान रैकिटिकने गोल करत बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ज्युवेन्ट्सने झुंझ देण्याच प्रयत्न केला मात्र पहिल्या हाफपर्यंत बार्सिलोनाची बचाव फोडून काढण्यात ज्युवेन्ट्सला अपयश आले. अखेर ज्युवेन्ट्सच्या अल्वारो मोराटाने गोल करत बरोबरी केली आणि स्पर्धेला खरी रंगत आली. पुढे सामन्याच्या ६८ व्या मिनिटाला लुईस सुआरेझने आणि शेवटी नेमारने गोल करत बार्सिलोनाला ३-१ अशी आघाडी मिळवून देत विजय प्राप्त केला.