थॉमस म्युलर आणि आर्येन रॉबीन यांच्या शानदार गोलच्या बळावर गतविजेत्या बायर्न म्युनिचने नव्या बुंडेसलिगा हंगामाचा शानदार प्रारंभ करताना वोल्फस्बर्गवर २-१ अशी मात केली.
हॉलंडच्या रॉबीनने दोन बचावपटूंना भेदत चेंडू विश्वविजेत्या जर्मनीचा खेळाडू म्युलरकडे दिला आणि त्याने ३७व्या मिनिटाला बायर्न म्युनिचच्या खात्यावर पहिला गोल नोंदवला. मग दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी ४७व्या मिनिटाला रॉबर्ट लेवँडस्कीच्या पासवर रॉबीनने दुसऱ्या गोलची नोंद केली. मग ५२व्या मिनिटाला इव्हिका ओलिसने एक नेत्रदीपक गोल साकारून वोल्फस्बर्गच्या खात्यावर पहिला गोल जमा केला. त्यानंतर बेल्जियमचा मध्यरक्षक ज्युनिअर मलांदाने सामना बरोबरीत सोडविण्याची संधी वाया दवडली.
या सामन्यात बायर्न म्युनिचच्या गियानल्युका गॉडिनोचे पदार्पण महत्त्वपूर्ण ठरले. १७ वष्रे २८४ दिवस वय असलेला गॉडिनो बायर्नचा चौथा युवा पदार्पणवीर ठरला.