16 December 2019

News Flash

फेडरेशन चषक कॅरम स्पर्धा : भारतीय कॅरमपटूंचे तिहेरी वर्चस्व

सोमवारी झालेल्या आठव्या फेरीच्या लढतीत झहीरने भारताच्याच इर्शाद अहमदचा २५-१० असा पराभव केला.

 

स्विस लीगमध्ये झहीर, अनिल आणि श्रीनिवास पदकाचे मानकरी

पीवायसी हिंदू जिमखाना, पुणे येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेतील स्विग लीग प्रकारात भारताच्या झहीर पाशा, अनिल मुंडे आणि के. श्रीनिवास यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई केली.

सोमवारी झालेल्या आठव्या फेरीच्या लढतीत झहीरने भारताच्याच इर्शाद अहमदचा २५-१० असा पराभव केला. झहीरने आठही सामने जिंकून सर्वाधिक १६ गुण कमावून सुवर्णपदकाला गवसणी घातली. अनिलने बांगलादेशच्या रहमान फिजूरला २५-८ अशी धूळ चारून १४ गुणांसह रौप्यपदक मिळवले, तर श्रीनिवासने भारताच्याच संदीप दिवेचा २५-० असा धुव्वा उडवून १४ गुणांसह कांस्यपदक मिळवले.

आंतरराष्ट्रीय कॅरम महासंघाचे अध्यक्ष जोसेफ मेयर आणि महाराष्ट्र कॅरम संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र शहा यांच्या हस्ते विजेत्यांना पदक आणि चषक देऊन गौरवण्यात आले. पहिल्या आठपैकी सात जणांमध्ये भारताच्याच खेळाडूंनी स्थान मिळवले, तर श्रीलंकेचा निशान फर्नाडो आठ खेळाडूंत प्रवेश करणारा अन्य देशांतील एकमेव खेळाडू ठरला.

First Published on December 4, 2019 12:39 am

Web Title: federation cup carrom tournament akp 94
Just Now!
X