News Flash

फिलँडरचे दक्षिण आफ्रिकेच्या संघात पुनरागमन

न्यूझीलंडविरुद्धचा कसोटी सामना जांघेतील दुखापतीमुळे खेळू न शकलेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज व्हेरनॉन फिलँडर पूर्णपणे तंदुरुस्त ठरला असून पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी त्याचे संघात पुनरागमन झाले

| January 22, 2013 12:13 pm

न्यूझीलंडविरुद्धचा कसोटी सामना जांघेतील दुखापतीमुळे खेळू न शकलेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज व्हेरनॉन फिलँडर पूर्णपणे तंदुरुस्त ठरला असून पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी त्याचे संघात पुनरागमन झाले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात फिलँडरला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता, पण या सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली आणि त्यानंतरच्या दुसऱ्या सामन्याला त्याला मुकावे लागले होते. पाकिस्तानविरुद्धचा पहिला कसोटी सामना १ फेब्रुवारीपासून येथील वॉण्डरस स्टेडियमवर होणार आहे.
संघ : ग्रॅमी स्मिथ (कर्णधार), हशिम अमला, अब्राहम डी‘व्हिलियर्स, फॅफ डय़ू प्लेसिस, डीन इल्गार, जॅक कॅलिस, रॉरी क्लेंव्हेल्ड, मॉर्ने मॉर्केल, अलव्हिरो पीटरसन, रॉबिन पीटरसन, व्हेरनॉन फिलँडर, जॅक्सेव रुडॉल्फ आणि डेल स्टेन.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 12:13 pm

Web Title: felander came back in african team
टॅग : South Africa,Sports
Next Stories
1 शॉन मार्श ऑस्ट्रेलियाच्या ट्वेन्टी-२० संघात
2 आंतर-आयटी क्रिकेट स्पर्धेत इन्फोसिसला विजेतेपद
3 पुजारा, रोहितला रणजीसाठी सोडणार नाही -बीसीसीआय
Just Now!
X