20 October 2020

News Flash

माजी पाक क्रिकेटपटू वासिम अक्रमला मँचेस्टर विमानतळावर अपमानास्पद वागणूक

सोशल मीडियावर व्यक्त केली नाराजी

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वासिम अक्रमला मँचेस्टर विमानतळावर, स्थानिक अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळाली आहे. खुद्द अक्रमने आपल्या ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी आपल्याशी उद्धटपणे बोलत, माझ्याजवळील औषधांची योग्य काळजी घेतली नसल्याचा आरोप वासिम अक्रमने केला आहे.

वासिम अक्रम हा मधुमेहाच्या आजाराने त्रस्त आहे. यासाठी डॉक्टरांनी दिलेली औषध तो नेहमी आपल्या जवळ बाळगतो. मात्र मँचेस्टर विमानतळावरील अधिकाऱ्यांनी अक्रमशी उद्धटपणे बोलत त्याला त्याची औषधं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवण्यास सांगितलं. आपल्यासाठी हा प्रकार अपमानास्पद असल्याचं अक्रमने म्हटलं आहे.

१९९७ सालपासून वासिमला मधुमेहाचा त्रास आहे. त्यावेळपासून वासिम अक्रम आपल्याजवळ डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं आणि इंजेक्शन जवळ बाळगतो. दरम्यान या प्रकरणी विमानतळ अधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाहीये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 6:36 pm

Web Title: felt embarrassed and humiliated at manchester airport says wasim akram psd 91
टॅग Wasim Akram
Next Stories
1 कसोटी क्रमवारीत विराटने राखलं अव्वल स्थान
2 बेन स्टोक्सने नाकारला New Zealander of the Year चा पुरस्कार
3 Video : “लष्करी गणवेश तुला शोभून दिसतो”; आनंद महिंद्रानी केला धोनीचा व्हिडीओ पोस्ट
Just Now!
X