18 January 2021

News Flash

“माझ्यावर प्रशिक्षकाकडून बलात्काराचा प्रयत्न”; महिला क्रिकेटपटूची मदतीसाठी गौतम गंभीरकडे धाव

प्रशिक्षकाकडून कारकिर्द संपवण्याची धमकी मिळाल्याचाही आरोप

दिल्ली येथील एका महिला क्रिकेटपटूने आपल्या प्रशिक्षकावर खळबळजनक आरोप करत भाजपा खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. दिल्लीच्या या महिला क्रिकेटपटूने आपल्यावर प्रशिक्षकाकडून विनयभंग आणि बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. त्या महिला क्रिकेटपटूने आपली व्यथा स्वत:च्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट करत मांडली आहे. या महिला क्रिकेटपटूने गौतम गंभीर याला त्या ट्विटमध्ये टॅग केले आहे.

माझा प्रशिक्षक मला माझी कारकिर्द संपवून टाकण्याची धमकी देत आहे, असे त्या महिला क्रिकेटपटूने ट्विटमध्ये नमूद केले आहे. महिला क्रिकेटपटूच्या या ट्विटनंतर दिल्ली क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या दरम्यान त्या महिला क्रिकेटपटूने या प्रकाराबाबत भाजपाचा विद्यमान खासदार गौतम गंभीर याच्याकडे मदतीसाठी धाव घेण्याचा पर्याय स्वीकारला आहे.

काय केलं आहे ट्विट –

”मी दिल्लीची एक महिला क्रिकेटपटू आहे. माझा प्रशिक्षक माझा विनयभंग आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो. मी त्याला विरोध केला तर तो मला माझी कारकिर्द संपवण्याची धमकी देतो. माझ्या प्रशिक्षकाचे संघ निवड समितीतील सदस्यांशी घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे त्यांना सांगून माझ्या क्रिकेटमधील वाटचालीला ब्रेक लावण्याची धमकी देण्यात येते. कृपया याची दखल घेत मला या संदर्भात मदत करावी”, असे त्या महिला क्रिकेटपटूने गौतम गंभीरला टॅग केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, या महिला क्रिकेटपटूने आपल्या ट्विटमध्ये ‘त्या’ त्रास देणाऱ्या प्रशिक्षकाचे नाव लिहीले नाही. त्यामुळे हा प्रशिक्षक नेमका कोण याबाबत सर्वांच्याच मनात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2020 4:37 pm

Web Title: female cricketer of delhi reaches out to gautam gambhir to file molestation complaint against coach says he is trying to rape me vjb 91
Next Stories
1 Ranji Trophy : पहिल्या डावात महाराष्ट्राची घसरगुंडी, ४४ धावांत संघ माघारी
2 मलिंगाने काहीही शिकवलं नाही! बुमराहचं धक्कादायक वक्तव्य
3 Virat Kohli Photo : विराट १० वर्षांपूर्वी ‘असा’ दिसायचा…
Just Now!
X