फेररी संघाकडून सलग पाच र्शयतीत अपयश आल्यानंतर फर्नाडो अलोन्सोने पुन्हा मॅक्लेरेन संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयावर सर्वानी टीका केली, परंतु माजी फॉम्र्युला वन चालक डेव्हिड कॉल्थर्ड यांनी अलोन्सोच्या या निर्णयाचे काहीच वाईट वाटत नसल्याचे सांगितले. यंदाच्या हंगामात अलोन्सोला ऑस्ट्रेलियन ग्रां. प्रि. मध्ये सहभाग घेता आला नव्हता, तर मलेशियन ग्रां. प्रि. मध्ये त्याला स्पर्धा अध्र्यावर सोडावी लागली होती. रविवारी झालेल्या चायनीज ग्रां. प्रि. मध्ये तो १२व्या स्थानावर फेकला गेला. यावर कॉल्थर्ड म्हणाले, ‘‘अलोन्सोच्या या निर्णयाचे वाईट वाटत नाही. तो त्याचा निर्णय आहे. मात्र, अलोन्सो आजही सर्वोत्तम शर्यतपटू आहे आणि तो दमदार पुनरागमन करेल. त्याने त्याच्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारायला हवी आणि त्यातून त्याला पळ काढता येणार नाही.’’