05 April 2020

News Flash

नेपाळ फुटबॉल संघटनेचे प्रमुख थापा यांच्यावर दहा वर्षांची बंदी

गणेश थापा यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली फिफाने दहा वर्षांची बंदी घातली आहे

नेपाळ फुटबॉल संघटनेचे प्रमुख गणेश थापा

नेपाळ फुटबॉल संघटनेचे प्रमुख गणेश थापा यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेने (फिफा) दहा वर्षांची बंदी घातली आहे. तसेच लाओस महासंघाचे कार्याध्यक्ष विफेट सिहाचर्क यांच्यावरही दोन वर्षांच्या बंदीची कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी नेपाळच्या राष्ट्रीय संघातील खेळाडू सामना फिक्स केल्या प्रकरणात दोषी आढळले होते. त्यात थापा यांच्यावरील बंदीमुळे नेपाळ फुटबॉलची प्रतिमा अधिक मलिन झाली आहे. आपल्या १९ वर्षांच्या कार्यकाळात कोटय़वधी डॉलरचा अपहार केल्याचा आरोप थापा यांच्यावर आहे. ‘‘थापा यांनी गेल्या अनेक वर्षांत गरप्रकार केले आहेत. यामध्ये अन्य फुटबॉल अधिकाऱ्यांकडून वैयक्तिक आणि कौटुंबिक फायद्यासाठी लाच स्वीकारल्याचाही समावेश आहे,’’ असे ‘फिफा’ने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ‘फिफा’च्या शिस्तपालन समितीने थापांवर २००९ आणि २०११च्या फिफा कार्यकारिणी समितीच्या निवडणुकीत लाच घेतल्याचा आरोप केला आहे. बंदीव्यतिरिक्त थापा यांना १९, ८५० अमेरिकन डॉलरचा आर्थिक दंडही ठोठावण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2015 12:31 am

Web Title: fifa bans nepal football chief for corruption
Next Stories
1 ब्राझिलियन ग्रां प्रि : रोसबर्गचा दबदबा
2 कनिष्ठ पुरुष आशिया चषक हॉकी स्पर्धा : सातत्यपूर्ण खेळ करण्यावर भारताचा भर
3 तिसऱ्या दिवशीही पाऊस
Just Now!
X