युक्रेन सरकार आणि रशिया समर्थक बंडखोर यांच्यात सुरू असलेल्या वादाचा फटका रशियात २०१८ मध्ये होणाऱ्या विश्वचषक आयोजनाला बसणार नाही. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे फिफाने स्पष्ट केले. स्पर्धेवर बहिष्कार ही भूमिका योग्य नाही. सहभागी देशांनी अशी भूमिका स्वीकारू नये यासाठी फिफा सर्वतोपरी प्रयत्न करेल असे फिफाकडून सांगण्यात आले. मलेशियाचे विमान युक्रेनमधील बंडखोर गटाने क्षेपणास्त्र डागून पाडल्यानंतर रशिया आणि युक्रेन यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. या घटनेमुळे काही देश फिफा विश्वचषक स्पर्धेवरच बहिष्कार घालण्याची चिन्हे आहेत.