फिफा क्रमवारीत सहाव्या स्थानावर विराजमान असलेल्या स्वित्र्झलडविषयी तसे सर्वानाच कुतूहल आहे. आतापर्यंत स्वित्र्झलड संघ जास्त प्रकाशझोतामध्ये नसला तरी त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये संघात कमालीचा बदल केला आहे. त्यामुळे या विश्वचषकात स्वित्र्झलडकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असून त्यांचा पहिला सामना इक्वेडोरशी होणार आहे.
स्वित्र्झलडचे प्रशिक्षक ओटमर हित्झफेल्ड यांनी स्वित्र्झलडच्या संघाची सुरेख बांधणी आहे. त्याचबरोबर संघामधील युवा खेळाडूंची कामगिरी दिवसेंदिवस बहरताना दिसत आहे.
इक्वेडोरने आतापर्यंत जास्त नावलौकिक मिळवला नसला तरी त्याच्यामध्ये स्वित्र्झलडला धक्का देण्याची क्षमता नक्कीच आहे. त्यामुळे या सामन्यात स्वित्र्झलडला गाफील राहून चालणार नाही. इक्वेडोरच्या खेळाडूंनी लीग सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली असून त्यांचा संघ तांत्रिक बाबींमध्ये उजवा असल्याचे म्हटले जात आहे.