18 September 2020

News Flash

कोस्टा रिकाचा दे धक्का!

विश्वचषकातील पहिल्या धक्कादायक विजयाची नोंद कोस्टा रिकाने केली. पहिल्या सत्रात पिछाडीवर पडलेल्या कोस्टा रिकाने उरुग्वेच्या बलाढय़ आव्हानाची पर्वा न करता ३-१ अशा शानदार विजयाची नोंद

| June 16, 2014 12:56 pm

विश्वचषकातील पहिल्या धक्कादायक विजयाची नोंद कोस्टा रिकाने केली. पहिल्या सत्रात पिछाडीवर पडलेल्या कोस्टा रिकाने उरुग्वेच्या बलाढय़ आव्हानाची पर्वा न करता ३-१ अशा शानदार विजयाची नोंद केली. कोपा अमेरिकन अजिंक्यपद खात्यावर असणाऱ्या उरुग्वेला सलामीच्या सामन्यात धडाकेबाज आक्रमणवीर लुईस सुआरेझची अनुपस्थिती प्रकर्षांने जाणवली.
पहिल्या सत्रात एडिन्सन काव्हानीने पेनल्टीद्वारे पहिला गोल झळकावून दक्षिण अमेरिकेच्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली; परंतु दुसऱ्या सत्रात ५४व्या आणि ५७व्या मिनिटाला अनुक्रमे जोएल कॅम्पबेल आणि ऑस्कर डय़ुआर्टे यांनी धडाधड गोलआक्रमण करीत कोस्टा रिकाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ८३व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून मैदानावर आलेल्या मार्को युरिनाने ८४व्या मिनिटाला तिसरा गोल नोंदवण्याची किमया साधली.
लिव्हरपूलचा अव्वल खेळाडू सुआरेझ गुडघ्याच्या दुखापतीतून सावरला नसल्याने या सामन्यात खेळू शकला नाही. निर्धारित वेळेनंतरच्या अतिरिक्त वेळेत मॅक्सी परेराला पंचांनी लाल कार्ड दाखवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2014 12:56 pm

Web Title: fifa world cup 2014 costa rica upsets uruguay
Next Stories
1 सट्टे पे सट्टा -पहिला धक्का..
2 भारतीय संघाचा सहज विजय
3 डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : कृष्णा पुनिया तिसऱ्या स्थानी
Just Now!
X