करोनाच्या प्रादुर्भावामुळे ‘फिफा’ क्लब विश्वचषक लांबणीवर टाकण्यात आला असून, आता‘फिफा’ विश्वचषक फु टबॉल स्पर्धेच्या पात्रता फे रीचे सामनेही पुढे ढकलण्यात आले आहेत. त्यामुळे कतार येथे २०२२मध्ये होणाऱ्या ‘फिफा’ विश्वचषक  स्पर्धेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

कतार येथे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या क्लब विश्वचषक फु टबॉल स्पर्धेचे वेळापत्रक पुन्हा आखण्यात येणार असल्याचे जागतिक फु टबॉल महासंघाचे (फिफा) अध्यक्ष जियानी इन्फॅ न्टिनो यांनी म्हटले आहे. जानेवारीपर्यंत दक्षिण अमेरिके तील विजेता संघ ठरणार नाही. त्यामुळे ही स्पर्धा जून २०२१मध्ये खेळवणार असल्याचे संके त इन्फॅ न्टिनो यांनी दिले आहेत. त्यामुळे एका वर्षांने पुढे ढकलण्यात आलेली युरो चषक तसेच कोपा अमेरिका स्पर्धेच्या आयोजनाचा मार्ग मोकळा होणार आहे.

२०२२च्या ‘फिफा’ विश्वचषकासाठीच्या दक्षिण अमेरिकेतील पात्रता फे रीला अद्याप सुरुवात झालेली नाही. मार्च महिन्यापासून सुरू होणारी ही स्पर्धा करोनामुळे आता ८ ऑक्टोबरपासून होणार आहे. मार्च २०२२पर्यंत ही स्पर्धा संपवताना ‘फिफा’ला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.