23 September 2020

News Flash

दंड हप्त्यांमध्ये भरलेला चालेल का? पाकिस्तान हॉकीचं आंतरराष्ट्रीय संघटनेला साकडं

पाकिस्तान हॉकी फेडरेशन आर्थिक संकटात

पाकिस्तान हॉकी फेडरेशन सध्या प्रचंड आर्थिक संकटात सापडलेली आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेने आयोजित केलेल्या, हॉकी प्रो-लिग स्पर्धेत पाकिस्तानने ऐनवेळी माघार घेतली. संघटनेच्या नियमांचं पालन न केल्यामुळे, आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेने पाकिस्तान हॉकी फेडरेशनला १ लाख ७० हजार युरोजचा दंड ठोठावला. मात्र आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तान हॉकी फेडरेशनने इतका मोठा दंड भरणं आम्हाला शक्य नसल्याचं कळवलं आहे.

आंतरराष्ट्रीय संघटनेने ठोठवलेल्या दंडाच्या बातमीला पाकिस्तान हॉकी फेडरेशनने दुजोरा दिला आहे. पाकिस्तान हॉकी फेडरेशनचे सचिव शाहबाज अहमद यांनी, हा दंड हप्त्यांमध्ये भरण्याची मूभा आंतरराष्ट्रीय संघटनेकडे मागितली आहे.

“पाकिस्तान हॉकी फेडरेशनकडे सध्या संघ सामन्यांना पाठवण्याइतकेही पैसे नाहीयेत. अशी परिस्थिती असताना आम्ही दंड कुठून भरणार?? सध्या पाकिस्तान हॉकीमध्ये प्रचंड आर्थिक तणाव सुरु आहे, ही परिस्थिती मी आंतरराष्ट्रीय संघटनेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सध्याच्या घडीला संघटनेला दंड ठोठावण्यापेक्षा आम्हाला मदतीची अपेक्षा आहे.” शाहबाज पत्रकारांशी बोलत होते.

पाकिस्तान हॉकी फेडरेशनवर आंतरराष्ट्रीय संघटनेने अद्याप बंदीची कारवाई केली नसल्यामुळे, पाकिस्तान संघटनेचे पदाधिकारी निधी जमावण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र २० जूनपर्यंत दंड न भरल्यास दंडाची रक्कम दुप्पट केली जाईल असा इशारा आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने दिला आहे. त्यामुळे आगामी काळात पाकिस्तान हॉकी फेडरेशन या प्रश्नावर कसा तोडगा काढते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2019 2:53 pm

Web Title: fih imposes hefty fine on pakistan phf says it does not have funds to pay it
Next Stories
1 IPL 2019 : RCB च्या सहकाऱ्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी
2 सचिनसोबत डिनरनंतर पृथ्वी शॉचे ट्विट, म्हणाला…
3 IPL 2019 : पंतच्या कामगिरीची पुनरावृत्ती?
Just Now!
X