28 September 2020

News Flash

FIH Pro League : भारताचा धडाकेबाज खेळ, नेदरलँडवर ५-२ ने मात

भारतीयांचा अष्टपैलू खेळ

हॉकी प्रो-लिग स्पर्धेत आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने धडाकेबाज सुरुवात केली आहे. जागतिक स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या नेदरलँडला भारताने पहिल्याच सामन्यात ५-२ ने हरवलं. भारतीय संघाने केलेल्या आक्रमक खेळापुढे नेदरलँडची डाळ शिजू शकली नाही.

पहिल्याच मिनीटाला गुरजंत सिंहने मैदानी गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. भारतीय संघाच्या या आक्रमणामुळे नेदरँडचा संघ काहीसा बॅकफूटवर गेला. यानंतर ललित उपाध्यायने नेदरलँडच्या पेनल्टी क्षेत्रात सुरेख चाल रचत, पेनल्टी कॉर्नर कमावला. भारताचा ड्रॅगफ्लिकर रुपिंदरपालनेही या संधीचं सोनं करत १२ व्या मिनीटाला चेंडू गोलपोस्टमध्ये ढकलत भारताची आघाडी २-१ ने वाढवली. नेदरलँडकडून जीप जान्सनने १४ व्या मिनीटाला एक गोल नोंदवत पाहुण्या संघाची आघाडी २-१ ने कमी केली.

दुसऱ्या सत्रात नेदरँलडने चांगलं पुनरागमन करत भारताच्या आघाडीच्या फळीची आक्रमण थोपवली. २८ व्या मिनीटाला जेरॉन हर्ट्झब्रेगरने गोल नोंदवत नेदरँडला २-२ अशी बरोबरी मिळवून दिली. मध्यांतराला भारतीय संघाने आपली रणनिती बदलत पुन्हा एकदा आक्रमणावर भर दिला. ३४ व्या मिनीटाला मनदीप सिंह आणि ३६ व्या मिनीटाला ललित उपाध्यायने नेदरलँडची बचावफळी भेदत सुरेख मैदानी गोल झळकावले. यानंतर नेदरलँडचा संघ पुनरागमन करुच शकला नाही. ४६ व्या मिनीटाला रुपरिंदरपालने पेनल्टी कॉर्नरवर आणखी एक गोल झळकावत भारताची आघाडी ५-२ ने वाढवत, पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 9:35 pm

Web Title: fih pro league india beat netherlands by 5 2 in first match psd 91
Next Stories
1 Ind vs NZ : लोकेश राहुलला पुन्हा कसोटी संघाचं तिकीट मिळण्याचे संकेत
2 Ind vs Aus : दुखापतीची चिंता भारताची पाठ सोडेना…
3 Ind vs Aus : बंगळुरुत लागणार मालिकेचा निकाल, जाणून घ्या आकडे काय सांगतात..
Just Now!
X