News Flash

सायनाच्या कारकीर्दीवर चित्रपट

‘फुलराणी’ सायना नेहवालच्या कारकीर्दीवर आधारित चित्रपटाची निर्मिती होणार आहे.

सायना नेहवाल

ऑलिम्पिक पदकासह भारतीय बॅडमिंटन विश्वाला नवा आयाम देणाऱ्या ‘फुलराणी’ सायना नेहवालच्या कारकीर्दीवर आधारित चित्रपटाची निर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे ‘तारे जमीं पर’ या राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या चित्रपटाचे मराठमोळे दिग्दर्शक अमोल गुप्ते हा चित्रपट तयार करणार आहेत. चित्रपटात सायनाची भूमिका साकारण्यासाठी दीपिका पदुकोण, आलिया भट या अभिनेत्रींची नावे चर्चेत आहेत. अमोल गुप्ते सायनाच्या कारकीर्दीवर चित्रपटाची निर्मिती करणार असून, पुढच्या वर्षीपासून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार असल्याची माहिती सायनाचे वडील हरवीर सिंग यांनी दिली. गुप्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सायना आणि तिच्या कुटुंबीयांची हैदराबाद येथे भेट घेतली. हा चित्रपट तयार करण्यासाठी गुप्ते यांनी बंगळुरूस्थित कंपनीकडून स्वामित्वहक्क घेतले आहेत.‘‘चित्रपटात सायनापेक्षा बॅडमिंटनला प्राधान्य मिळाल्यास आम्हाला अधिक आनंद होईल. चित्रपटाविषयी सायना उत्साहित आहे. युवा खेळाडूंनी प्रेरणा घेऊन बॅडमिंटनकडे वळावे यादृष्टीने हा चित्रपट तयार व्हावा अशी सायनाची इच्छा आहे,’’ असे हरवीर सिंग यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 5:43 am

Web Title: film on saina nehwal career
टॅग : Film,Saina Nehwal
Next Stories
1 फिफा क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धा : सुआरेझची हॅट्ट्रिक, बार्सिलोना अंतिम फेरीत
2 फिफाच्या शिस्तपालन समितीसमोर ब्लाटर हजर
3 खेळाडूंचे मानधन दिल्याशिवाय महाकबड्डीला मान्यता नाही!
Just Now!
X