विश्वचषकाच्या अंतिम सामन्याला एका आठवडय़ाहून अधिक कालावधी उलटला असला तरी त्याविषयी अद्यापही खेळाडू आणि चाहत्यांमध्ये चर्चा सुरूच आहेत. इंग्लंडविरुद्धचा तो सामना कारकीर्दीतील सर्वोत्तम तसेच वाईट दिवससुद्धा ठरला, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलने मंगळवारी व्यक्त केली.

‘सुपर ओव्हर’पर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या जोस बटलरने गप्टिलला धावचीत केले व सर्वाधिक सीमापार फटक्यांच्या बळावर इंग्लंडने जगज्जेतेपद मिळवले. त्या पराभवामुळे गप्टिल अजूनही अस्वस्थ आहे.