News Flash

जागतिक बॅडमिंटन मालिका अंतिम टप्पा : सिंधूपुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान

जागतिक बॅडमिंटन मालिकेच्या अंतिम टप्प्यासाठी फक्त सुपर सीरिज स्पर्धाच्या क्रमवारीतील अव्वल आठ क्रमांकांचे खेळाडूच पात्र ठरतात.

जागतिक अजिंक्यपद सुवर्णपदक जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू झगडत आहे. परंतु बुधवारपासून सुरू होणाऱ्या ‘बीडब्ल्यूएफ’ जागतिक बॅडमिंटन मालिकेच्या अंतिम टप्प्यात सिंधू जेतेपद टिकवण्यासाठी प्रयत्नशील असेल.

ऑगस्ट महिन्यात बॅसेल (स्वित्र्झलड) येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत सिंधूने कारकीर्दीतील सर्वोत्तम यश मिळवताना विजेतेपदाला गवसणी घातली. परंतु त्यानंतर तिची कामगिरी ढासळली. कोरिया आणि फुझोऊ चायना खुल्या बॅडिमटन स्पर्धामध्ये ती पहिल्याच फेरीत गारद झाली, तर चायना, डेन्मार्क आणि हाँगकाँग खुल्या स्पर्धामध्ये तिने दुसऱ्या फेरीत गाशा गुंडाळला. फ्रेंच खुल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल, हीच तिची जगज्जेतेपदानंतरची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

जागतिक बॅडमिंटन मालिकेच्या अंतिम टप्प्यासाठी फक्त सुपर सीरिज स्पर्धाच्या क्रमवारीतील अव्वल आठ क्रमांकांचे खेळाडूच पात्र ठरतात. सिंधू वर्षांखेरीस १५व्या स्थानावर आहे. परंतु विश्वविजेतेपद नावावर असल्यामुळे तिला या स्पर्धेत स्थान मिळवता आले आहे. महत्त्वाच्या स्पर्धामध्ये कामगिरी उंचावणाऱ्या सिंधूकडे या स्पर्धेतही आशेने पाहिले जात आहे. कारण २०१७ आणि २०१८मध्ये तिने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे.

स्पर्धेची गटवारी

अ-गट : पी. व्ही. सिंधू (भारत), चेन यू फेई (चीन), ही बिंग जियाओ (चीन), अकानी यामागुची (जपान)

ब-गट : ताय झू यिंग (चायनीज तैपेई), रॅटचानोक इन्टॅनॉन (थायलंड), बुसानन ओंगबॅमरंगफा (थायलंड), नोझोमी ओकुहारा (जपान).

आजचा सामना

पी. व्ही. सिंधू वि. अकाने यामागुची

सामन्याची वेळ : सकाळी ८.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, ३

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 12:57 am

Web Title: final phase of the world badminton series akp 94
Next Stories
1 भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट मालिका : आज वर्चस्वासाठी लढाई
2 ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड कसोटी मालिका : ऑस्ट्रेलियाचे पारडे जड
3 ..तर धोनी विश्वचषकात  नक्कीच खेळेल!
Just Now!
X