16 December 2017

News Flash

कुकचे द्विशतक हुकले तरी तिस-या कसोटीवर इंग्लंडचे वर्चस्व

द्विशतकाच्या दिशेने दिमाखात वाटचाल करणारा इंग्लंड संघाचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक १९० धावांवर बाद झाला.

कोलकाता | Updated: December 7, 2012 1:21 AM

द्विशतकाच्या दिशेने दिमाखात वाटचाल करणारा इंग्लंड संघाचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक १९० धावांवर बाद झाला. विराट कोहलीने त्याला धावबाद केले.   कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने तिस-या दिवशी धुव्वांधार फटकेबाजी करत ३७७ चेंडूंमध्ये २३ चौकार आणि दोन षटकरांसह १९० धावा केल्या. मात्र, फक्त १० धावांनी त्याचे द्विशतक हुकल्याने इंग्लंडच्या चाहत्यांची फोर मोठी निराशा झाली आहे. मात्र, सलग तिस-या दिवशी भारतीय संघाची दमछाक करत इंग्लंडच्या संघाने तिस-या कसोटीवर आपले वर्चस्व प्रस्तापित केले आहे. लान बेल (१)  आणि केवन पिटरसन(१२) धावांवर खेळत असून, सध्या इंग्लंड ३ बाद ३६१ अशा सुस्थितीत आहे. दुस-या दिवसअखेर इंग्लंडने पहिल्या डावात १ बाद २१६ धावा काढल्या होत्या. त्यावर आज धावांचा डोंगर रचत कूकने आणि जोनाथन ट्रॉटने ८७ धावा करत भारतीय गोलंदाजांना मेटाकुटीला आणले.
इंग्लंडने मोठी धावसंख्या उभारली असून अद्याप ७ गडी शिल्लक आहेत. त्यामुळे टीम धोनीवर कमालीचे दडपण आले आहे. इंग्लंडने भारताचा पहिला डाव ३१६ धावांत गुंडाळला होता. 

First Published on December 7, 2012 1:21 am

Web Title: finally cook goes after playing a brilliant innings of 190