06 July 2020

News Flash

मुंबईतील पंचांना आर्थिक मदत

मुंबई क्रिकेट संघटनेच्या माजी पंचांचा पुढाकार

संग्रहित छायाचित्र

एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये मुंबईत सर्वाधिक स्थानिक क्रिकेट खेळले जाते, मात्र करोनामुळे सध्या मुंबई शहरातील स्थानिक क्रिकेट पूर्णपणे थांबले आहे. त्याचा फटका दररोज होणाऱ्या सामन्यांमध्ये पंचगिरी करून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असणाऱ्या गुणलेखक आणि पंचांना बसत आहे. या गरजू मंडळींच्या मदतीसाठी मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) माजी पंच पुढे सरसावले आहेत.

‘एमसीए’चे माजी कार्यकारिणी सदस्य आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी पंच गणेश अय्यर यांनी याबाबतीत पुढाकार घेतला आहे. त्यांनी त्यासाठी माजी पंचांकडून निधी गोळा करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘‘स्थानिक पंच आणि गुणलेखक यांचा रोजगार मुंबईत होणाऱ्या स्थानिक क्रिकेट सामन्यांवर मोठय़ा प्रमाणात अवलंबून आहे. त्यांना माजी पंचांनी आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे,’’ असे अय्यर यांनी सांगितले.

‘एमसीए’चे स्पर्धा समन्वयक अभय हडप यांनी सांगितले की, ‘‘गुणलेखकाला प्रत्येक सामन्याचे दिवसाला १५०० रुपये मिळतात आणि पंचांना प्रत्येक सामन्याचे दिवसाला २००० रुपये मिळतात. आतापर्यंत अडीच लाख रुपयांची मदत जमा के ली आहे.’’

‘‘एमसीएच्या माजी पंचांनी स्वेच्छेने आर्थिक मदत करावी, असे आवाहन केले होते. स्थानिक सामन्यांवर ज्या गुणलेखक आणि पंचांचा रोजगार अवलंबून आहे त्यांची यादी आमच्याकडे आहे. ४७ पंच आणि १५ गुणलेखक अशा एकूण ६२ जणांना आम्ही प्रत्येकी ३००० रुपये सुरुवातीला दिले आहेत. त्यांच्या बँक खात्यांत हे पैसे जमा करण्यात आले आहेत,’’ असे अय्यर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 12:28 am

Web Title: financial assistance to umpire in mumbai abn 97
Next Stories
1 गंभीरकडून दोन वर्षांचा पगार सहायता निधीला
2 डकवर्थ-लुइसचे जनक टोनी लुइस यांचे निधन
3 RCB अजुन आयपीएल कसं जिंकू शकली नाही?? पिटरसनच्या प्रश्नाला कोहलीने दिलं उत्तर…
Just Now!
X