IPL 2020ची ही स्पर्धा युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे. त्यामुळे आता साऱ्यांनाच IPLचे वेध लागले आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहली याचा एक फोटो RCBने ट्विट केला. त्या फोटोत त्याच्यासोबत एक सिंहाचा फोटोदेखील होता. हा फोटो ट्विट करत RCBने फोटोतील फरकक ओळखा असं आव्हान चाहत्यांना दिलं. १० ऑगस्टला जागतिक सिंह दिवस (World Lion Day) असतो. त्या अनुषंगाने RCBने हा फोटो शेअक केला होता. सिंह आणि विराट कोहली या दोघांचा फोटो बाजूबाजूला लावत ‘आम्हाला तर यातला फरक ओळखता आलेला नाही. तुम्हाला फरक ओळखता येतो का पाहा’, असे आव्हान त्यांनी दिले.

हा फोटो पाहून CSK ने सिंहाचा आपल्या आईसोबतचा फोटो पोस्ट केला. ‘आई दिवसभर रडत होती. तू कुठे निघून गेला होतास. तुझ्या केसांची तू काय अवस्था करून घेतलीस’, अशी कमेंट करत त्यांनी RCBची मस्करी केली.

या फोटोवर भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याने मात्र झकास रिप्लाय दिला. दोन्ही सिंह आहेत हे त्याने मान्य केले. त्यानंतर त्याने कमेंट केली की या फोटोत एकच फरक आहे. एका सिंहाने कपडे परिधान केले आहेत तर दुसऱ्या सिंहाने कपडे घातलेले नाहीत.

RCBच्या फोटो पोस्टला २४ हजार लाईक्स मिळाले, पण चहलच्या एका कमेंटला जवळपास १९ हजारांहून अधिक चाहत्यांनी लाईक केलं. दरम्यान, चहलने नुकताच यूट्युबर धनश्री वर्मा हिच्याशी साखरपुडा केला. घरच्या घरीच एका छोटाशा समारंभात हा सोहळा पार पडला. हे दोघे IPLच्या आधी लग्नगाठ बांधणार की नंतर हे मात्र अद्याप सांगण्यात आलेले नाही.