युरोपचा फुटबॉल वर्ल्डकप म्हणून ओळखला जाणाऱ्या युरो कपला दणदणीत सुरुवात झाली. आज होणाऱ्या तीन सामन्यांपैकी दुसरा सामना फिनलँड आणि डेन्मार्क यांच्यात रंगला. ब गटात रंगणाऱ्या या सामन्यासाठी सर्वजण आतुरले होते. मात्र, सामन्यादरम्यान डेन्मार्कचा खेळाडू ख्रिश्चियन एरिक्सन मैदानावर कोसळल्याने हा सामना स्थगित करण्यात आला. एरिक्सनची प्रकृती ठीक असल्याचे समोर आल्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला. यात स्पर्धेतील नवख्या फिनलँडने बलाढ्य डेन्मार्कचा १-०  पराभव करून इतिहासात नाव कोरले.  फिनलँड प्रथमच प्रमुख आणि मोठ्या स्पर्धेत खेळत आहे.

दुसे सत्र

दुसऱ्या सत्रात डेन्मार्कने एरिक्सनशिवाय खेळायला सुरुवात केली.  या सत्रात डेन्मार्कला गोल करण्याच्या संधी मिळाल्या, पण ते संधी साधण्यात अपयशी ठरले. सामन्याच्या ५९व्या मनिटाला फिनलँडच्या पोहजांपालोने सुरेख गोल करत आघाडी मिळवली. पोहजांपालोचा हा गोल संघाला ऊर्जा देणारा ठरला. त्यानंर डेन्मार्कच्या प्रत्येक हल्ल्याचा बचाव करण्या फिनलँडला यश आहे. डेन्मार्कची पेनल्टी किकही व्यर्थ गेली. सामन्याची वेळ संपल्यानंतर चाहत्यांनी आणि खेळाडूंनी जल्लोष साजरा केला.

 

पहिले सत्र

सामन्याचे पहिले सत्र गोलरहित होते. दोन्ही संघाचे खेळाडू आक्रमक अंदाजात पाहियला मिळाले, मात्र पहिल्या सत्रात त्यांना गोल करता आला नाही. जास्तीत जास्त वेळ फुटबॉल स्वत:जवळ ठेवण्यात डेन्मार्क संघाला यश आले. २३२ वेळा त्यांनी आपल्या खेळाडूंकडे फुटबॉल पास केला. तर फिनलँडच्या संघाने १४१ वेळा फुटबॉल पास केला. डेन्मार्कच्या संघाला ६ कॉर्नर शूटआउट मिळाले. मात्र या संधीचे गोलमध्ये रुपांतर करण्यास त्यांना अपयश आले. त्यानंतर एरिक्सनची घटना घडल्यानंतर सामना थांबवावा लागला.

हेही वाचा – खरा नायक! युरो कपमधील काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेनंतर मॅच रेफरी ठरले चर्चेचा विषय

साधारणपणे दर चार वर्षांनी खेळली जाणारी ही स्पर्धा गतवर्षी होणे अपेक्षित होते. परंतु करोना साथीच्या पार्श्वभूमीवर क्रीडा क्षेत्र ठप्प पडल्यामुळे २०२१मध्ये युरो कप खेळवण्याचे ठरवण्यात आले. त्यातच प्रेक्षकांनाही मर्यादित संख्येत स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या तणावापूर्ण वातावरणाच्या पाश्र्वभूमीवर किमान पुढील एक महिना तरी क्रीडाप्रेमींना फुटबॉलचा रोमांच अनुभवायला मिळणार आहे. ११ जून ते ११ जुलै दरम्यान एकूण २४ संघांत खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेला ‘फिफा’ विश्वचषकाप्रमाणेच महत्त्व आहे.