News Flash

पुजाराचा पहिलाच बळी आत्मविश्वास उंचावणारा -रहकीम

कसोटी क्रिकेटमधील वजनदार व्यक्तिमत्त्वाच्या २६ वर्षीय कॉर्नवॉलने आपल्या तिसऱ्या षटकात पुजाराला बाद केले.

किंग्स्टन : पदार्पणाच्या कसोटी सामन्यातील पहिलाच बळी  हा चेतेश्वर पुजाराचा मिळवणे, हे आत्मविश्वास उंचावणारे आहे, अशी प्रतिक्रिया वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू रहकीम कॉर्नवॉलने व्यक्त केली. कसोटी क्रिकेटमधील वजनदार व्यक्तिमत्त्वाच्या २६ वर्षीय कॉर्नवॉलने आपल्या तिसऱ्या षटकात पुजाराला बाद केले. पहिल्या दिवसाच्या खेळाबाबत कॉर्नवॉल म्हणाला, ‘‘आमच्या वेगवान गोलंदाजांनी दिमाखदार कामगिरी बजावली. माझ्याकडे जेव्हा चेंडू देण्यात आला, तेव्हा मीसुद्धा जबाबदारीने गोलंदाजी केली.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2019 2:48 am

Web Title: first wicket rahkeem cheteshwar pujara test match akp 94
Next Stories
1 India vs West Indies : हनुमाचे झुंजार शतक
2 यू मुंबाकडून जयपूरचा धुव्वा
3 मँचेस्टर सिटीकडून ब्रायटनचा धुव्वा
Just Now!
X