25 May 2020

News Flash

U-19 विश्वचषकातला राडा; ICC कडून बांगलादेशी खेळाडूंसह भारतीय खेळाडूंवरही कारवाई

तीन बांगलादेशी खेळाडूंसह दोन भारतीय खेळाडूंवर कारवाई

रविवारी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशने पाकिस्तानवर मात करत विजेतेपद पटकावलं. मात्र या सामन्यानंतर सेलिब्रेशन करताना बांगलादेशी आणि भारतीय खेळाडूंमध्ये वाद झाला. पंचांनी वेळेतच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या राड्यामुळे बांगलादेशच्या विजयाला गालबोट लागलं. अखेरीस आयसीसीने या प्रकरणात व्हिडीओ फुटेज तपासत, राडा घालणाऱ्या ५ खेळाडूंवर कारवाई केली आहे.

अवश्य वाचा – U-19 World Cup : बांगलादेशच्या विजयात माजी मुंबईकर खेळाडूची महत्वाची भूमिका

बांगलादेशकडून तौहीद हृदॉय, शमिम हुसैन आणि रकीब उल-हसन तर भारताकडून आकाश सिंह आणि रवी बिश्नोई यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे. या पाचही खेळाडूंवर आयसीसीच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी ४ ते १० Demerit Point बहाल करण्यात आलेले आहेत. (बेशिस्त वर्तणुकीसाठी आयसीसीकडून मिळणारी शिक्षा) . “सामना अतिशय रंगतदार झाला…पण बांगलादेशच्या विजयानंतर जो प्रकार घडला त्याच्याकडे आयसीसी कधीच डोळेझाक करु शकणार नाही”, ICC च्या अधिकाऱ्यांनी या विषयी माहिती दिली.

अवश्य वाचा – बहिणीच्या निधनाचं दु:ख विसरुन तो वाघासारखा लढला, वाचा विश्वचषक विजेत्या अकबर अलीची कहाणी

बांगलादेशच्या हृदॉयला १० Demerit Point देण्यात आलेले असून पुढील दोन वर्षांसाठी हे गुण त्याच्या नावावर कायम राहणार आहेत. याव्यतिरीक्त शमीमला ८ तर रकीब उल-हसनला ४ Demerit Point देण्यात आलेले आहेत. याचसोबत भारताच्या आकाश सिंहला ८ तर रवी बिश्नोईला ५ Demerit Point बहाल करण्यात आले आहेत. याव्यतिरीक्त सामन्यादरम्यान आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी रवी बिश्नोईवर अधिकच्या २ Demerit Point गुणांची कारवाई करण्यात आलेली आहे. क्रिकेटमध्ये इतरांप्रती आदर दाखवणं ही महत्वाची गोष्ट समजली जाते. खेळाडूंनी मैदानात असताना शिस्तीने वागणं, सामना जिंकल्यानंतर किंवा गमावल्यानंतर प्रतिस्पर्ध्यांचं अभिनंदन करणं हे महत्वाचं असतं. मात्र अंतिम सामन्यानंतर जो प्रकार घडला त्यात या सर्व नियमांचा भंग झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2020 8:52 am

Web Title: five players including ravi bishnoi akash singh sanctioned after under19 world cup final brawl psd 91
Next Stories
1 U-19 World Cup : बांगलादेशच्या विजयात माजी मुंबईकर खेळाडूची महत्वाची भूमिका
2 बहिणीच्या निधनाचं दु:ख विसरुन तो वाघासारखा लढला, वाचा विश्वचषक विजेत्या अकबर अलीची कहाणी
3 विवेक प्रसादला ‘उदयोन्मुख हॉकीपटू’चा पुरस्कार
Just Now!
X