५ वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या रशियाच्या ग्लॅमरस टेनिसपटू मारिया शारापोव्हाने निवृत्ती स्विकारलेली आहे. आपल्या कारकिर्दीत शारापोव्हाने फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेची २, तर ऑस्ट्रेलियन-विम्बल्डन आणि अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेचं प्रत्येकी एक विजेतेपद मिळवलं आहे. मध्यंतरी उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणात शारापोव्हावर बंदी घालण्यात आली होती. यानंतर शारापोव्हाने दमदार पुनरागमन केलं, मात्र यानंतर तिला एकाही मोठ्या स्पर्धेचं विजेतेपद मिळवता आलं नाही.

आपल्या उमेदीच्या काळात शारापोव्हा जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून शारापोव्हा फॉर्मात नव्हती, ज्यामुळे अखेरीस तिने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. लहानपणापासून ज्या कोर्टवर तुम्ही सराव केला आहोत ते कोर्ट सोडणं खूप कठीण असतं. या २८ वर्षांत टेनिसने मला खूप काही दिलं आहे. मात्र आता निवृत्तीची वेळ आलेली आहे. Goodbye Tennis…अशा शब्दांत शारापोव्हाने आपल्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.