निवृत्तीनंतर दोन वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या फ्लॉयड मेवेदरने बॉक्सिंग जगतातील सर्वात महागडा सामना जिंकला आहे. आपल्या व्यावसायिक बॉक्सिंग कारकिर्दीत एकही सामना न गमावणाऱ्या मेवेदरने २९ वर्षीय आयरिश बॉक्सर कोनोर मॅक्ग्रेगॉरला १० व्या फेरीत नॉक आऊट केले. लास वेगासच्या टी-मोबाईल अरिनामध्ये ४० वर्षांच्या मेवेदरने कोनोर मॅक्ग्रेगॉरचा पराभव करत ५० वा सामना जिंकला.

मेवेदरने आतापर्यंत ५० पैकी २७ बाऊट नॉकआऊटमध्ये जिंकल्या आहेत. या सामन्यावर ६०० मिलियन डॉलरचा म्हणजेच ३ हजार ८३२ कोटी रुपयांचा सट्टा लागला होता. ‘अशा प्रकारच्या सामन्यावर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात सट्टा लागला होता,’ अशी माहिती एमएमए अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशीपचे मुख्य कार्यकारी डाना वाइट यांनी दिली. टी-मोबाईल अरिनामध्ये यावेळी २० हजार प्रेक्षक उपस्थित होते. या सामन्याच्या तिकिटाची किंमत १०० डॉलर ते २५० डॉलर (६४०० रुपये ते १६ हजार रुपये) इतकी होती. या सामन्याला प्रेक्षकांची १०० टक्के उपस्थिती होती, अशी माहिती आयोजकांनी दिली.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: रोहित शर्माने तोडला पोलार्डचा मोठा विक्रम, मुंबईसाठी हा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad Updates in marathi
IPL 2024 : ट्रॅव्हिस हेडने झळकावले वादळी शतक, आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला चौथा खेळाडू
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs LSG: मयंक यादवने स्वतःचाच विक्रम मोडला, आयपीएलमधील वेगवान गोलंदाजांच्या यादीत मिळवले स्थान

मेवेदर १२ सप्टेंबर २०१५ रोजी शेवटचा सामना खेळला होता. २ हजार ७०० कोटींची मालमत्ता असलेला मेवेदर जगातील सर्वात श्रीमंत अॅथलीट आहे. जगातील सर्वात महागड्या बॉक्सिंगच्या सामन्याची घोषणा दोन महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. या सामन्याचे थेट प्रक्षेपण २०० हून अधिक देशांमध्ये करण्यात आले. जगभरात १ अब्ज लोकांनी या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहिले.

२०१५ मध्ये मेनी पेकियाओचा पराभव करुन मेवेदरने वेल्टरवेट किताब पटकावला होता. मात्र जागतिक बॉक्सिंग संघटनेने त्याच्याकडून हा किताब हिसकावून घेतला होता. मेवेदरला दोन लाख डॉलरचा दंड भरण्यास सांगण्यात आले होते. मात्र मेवेदरने दंड भरला नाही. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वीच लास वेगासमधील बहुचर्चित सामना जिंकून मेवेदरने २२ कोटी डॉलरची कमाई केली होती. मात्र तरीही त्याने जागतिक बॉक्सिंग संघटनेकडून ठोठावण्यात आलेला दंड मेवेदरने भरला नाही.